IND vs AUS, 1st ODI Live : रवींद्र जडेजाचा अफलातून झेल अन् MS Dhoni चं दहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल, Video

India vs Australia 1st ODI Live : मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा ( ५) त्रिफळा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 03:43 PM2023-03-17T15:43:58+5:302023-03-17T15:44:20+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : Ravindra Jadeja takes a great catch,Marnus Labuschagne goes, ms Dhoni tweet goes viral, Video  | IND vs AUS, 1st ODI Live : रवींद्र जडेजाचा अफलातून झेल अन् MS Dhoni चं दहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल, Video

IND vs AUS, 1st ODI Live : रवींद्र जडेजाचा अफलातून झेल अन् MS Dhoni चं दहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st ODI Live : मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा ( ५) त्रिफळा उडवला. पण, स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श यांनी ७२ धावांची भागीदारी करून कांगारूंचा डाव रुळावर आणला होता. कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya)  स्मिथला बाद करून मोठे यश मिळवून दिले आणि त्यानंतर फिरकीपटूंनी फास आवळला. रवींद्र जडेजाने अर्धशतकवीर मार्शला बाद केले आणि त्यानंतर कुलदीप यादवने अनुभवी मार्नस लाबुशेनची विकेट घेतली. शॉर्ट थर्डवर उभ्या असलेल्या जडेजाने हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला.  

शार्दूलच्या गोलंदाजीवर वाचला, हार्दिकने 'पट्ट्यात' घेतला; स्टीव्ह स्मिथचा KL Rahulने सुरेख झेल टिपला

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांची अडचण केली होती. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला बोलावण्यात आले आणि त्याच्या गोलंदाजीवर स्मिथला LBW दिले गेले. पण, त्याने DRS घेतला अन् जीवदान मिळालं. मात्र पुढच्याच म्हणजे १२व्या षटकात हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. यष्टिरक्षक लोकेश राहुलने सुरेख झेल टिपला. स्मिथ २२ धावांवर माघारी परतला अन् मार्शसोबत त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. ( पाहा स्मिथच्या विकेटचा व्हिडीओ)

मार्शने अर्धशतक पूर्ण करताना काही अप्रतिम षटकार खेचून संघाची धावसंख्या शतकपार नेली. मार्शचे फटके पाहून चाहते चिंतेत गेले होते आणि ही चिंता रवींद्र जडेजाने दूर केली. मार्श ६५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर सिराजकरवी झेलबाद झाला. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. मार्नस लाबुशेन ( १५) याचा  रवींद्र जडेजाने अफलातून झेल टिपला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : Ravindra Jadeja takes a great catch,Marnus Labuschagne goes, ms Dhoni tweet goes viral, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.