IND vs AUS, 1st ODI Live : लोकेश राहुल उभा राहिला म्हणून भारत जिंकला; रवींद्र जडेजा, शमी, सिराज यांनीही विजयात वाटा उचलला 

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्याही आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 08:41 PM2023-03-17T20:41:52+5:302023-03-17T20:42:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi :When KL Rahul came to bat India was 16/3 and he scored 75* runs from 91 balls, India have defeated Australia to lead the ODI series 1-0 | IND vs AUS, 1st ODI Live : लोकेश राहुल उभा राहिला म्हणून भारत जिंकला; रवींद्र जडेजा, शमी, सिराज यांनीही विजयात वाटा उचलला 

IND vs AUS, 1st ODI Live : लोकेश राहुल उभा राहिला म्हणून भारत जिंकला; रवींद्र जडेजा, शमी, सिराज यांनीही विजयात वाटा उचलला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्याही आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे आघाडीचे तिन्ही फलंदाज माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाने भारताला धक्का दिला. हार्दिक पांड्या व लोकेश राहुल ( KL Rahul)  यांनी भारताचा डाव सावरला. हार्दिकनंतर  राहुल एका बाजूने विकेट टिकवून उभा राहिला आणि त्याला रवींद्र जडेजाची ( Ravindra Jadeja)  साथ मिळाली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना भारताचा विजय पक्का केला. राहुलने संयमी अर्धशतक झळकावले आणि भारताला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. 

मिचेल मार्शने मध्येच थांबवले म्हणून भडकला हार्दिक पांड्या, अम्पायरसोबत भांडला, Video 


१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतालाही दुसऱ्या षटकात धक्का बसला. इशान किशन ( ३) मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर LBW झाला. मिचेल स्टार्कच्या तिसऱ्या षटकात शुबमन गिलचा झेल यष्टिरक्षक जॉश इंग्लिसने टाकला. पण, त्याची भरपाई विराट कोहलीची ( ४) विकेट घेऊन स्टार्कने केली. भारताला १६ धावांवर दुसरा धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने आणखी एक विकेट घेताना सूर्यकुमार यादवला भोपळ्यावर बाद केले. दोन जीवदान मिळूनही शुबमनने ( २०) विकेट फेकली. स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याने मार्नस लाबुशेनकडे झेल दिला. भारताने ३९ धावांत चौथा फलंदाज गमावला. 

कर्णधार हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर भारताची सर्व भीस्त होती आणि दोघांनी सुरेख खेळ केला. हार्दिक व लोकेश यांनी ५५ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी केली. मार्कस स्टॉयनिसने अप्रतिम बाऊन्सर टाकून हार्दिकला ( २५) बाद केले. भारताने ८३ धावांत पाचवा फलंदाज गमावला. लोकेश राहुल एका बाजूने विकेट टिकवून होता आणि त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली. या दोघांनी ५०+ धावांची भागीदारी केली. राहुलने ७३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. आता राहुलने फटकेबाजी सुरू केली अन् भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ३९.५ षटकांत ५ बाद १९१ धावा करून विजय मिळवला. लोकेश राहुल ७५,तर रवींद्र जडेजा ४५ धावांवर नाबाद राहिले.


दरम्यान, मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. मजबूत स्थितीत वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज शमीने ११ चेंडूत माघारी पाठवून भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श ही जोडी तुटल्यानंतर कांगारूंचा डाव गडगडला. स्टीव्ह स्मिथ ( २२) व मिचेल मार्श यांची ७२ धावांची भागीदारी १२व्या षटकात हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली.  मार्श ६५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. मोहम्मद शमीने जॉश इंग्लिस ( २६) , कॅमेरून ग्रीन ( १२) आणि मार्कस स्टॉयनिस ( ५) या विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर गुंडाळला. शमीने ६-२-१७-३ अशी, सिराजने ५.४-१-२९-३ अशी गोलंदाजी केली. रवींद्र जडेजाने दोन, तर कुलदीप व हार्दिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.  
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi :When KL Rahul came to bat India was 16/3 and he scored 75* runs from 91 balls, India have defeated Australia to lead the ODI series 1-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.