ठळक मुद्देभारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १७४ धावांचे आव्हान ठेवले होते.भारताचा सलामीवीर शिखर धवनने ४२ चेंडूंत ७६ धावांची खेळी साकारली.मोक्याच्या क्षणी पंत आणि कार्तिक बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी मिळाली.
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार धावांनी विजय मिळवला. विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १७४ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताचा सलामीवीर शिखर धवनने ४२ चेंडूंत ७६ धावांची खेळी साकारली. धवन बाद झाल्यावर सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला होता. पण रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचे आव्हान कायम ठेवले होते. पण मोक्याच्या क्षणी पंत आणि कार्तिक बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी मिळाली.