IND vs AUS T20 2022 Live : जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आजच्या सामन्यात नाही खेळणार; ऑस्ट्रेलियाने Mumbai Indiansच्या खेळाडूला उतरवले

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:34 PM2022-09-20T18:34:23+5:302022-09-20T18:38:15+5:30

whatsapp join usJoin us
ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming : Australia won the toss and decided to bowl first, Tim David debut; Jasprit Bumrah and Rishabh Pant are not playing tonight's match, know playing Xi | IND vs AUS T20 2022 Live : जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आजच्या सामन्यात नाही खेळणार; ऑस्ट्रेलियाने Mumbai Indiansच्या खेळाडूला उतरवले

IND vs AUS T20 2022 Live : जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आजच्या सामन्यात नाही खेळणार; ऑस्ट्रेलियाने Mumbai Indiansच्या खेळाडूला उतरवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना आज मोहाली येथे खेळवला जात आहे. रोहित शर्मा अँड कंपनीसमोर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे आणि त्यावरूनच भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी किती तयार आहे, हे कळणार आहे. २० महिन्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० सामना  होत आहे.  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत २३ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आणि त्यात भारताने १३-९ अशी आघाडीघेतली आहे. १ सामना अनिर्णीत राहिला. भारतात खेळलेल्या  ७ पैकी ३ सामनेच ऑस्ट्रेलियाला जिंकता आले आहेत.   Ind vs Aus Live Match, Ind Vs Aus Live Scorecard


आशिया चषक २०२२ स्पर्धेत विराटने शतकासह २७६ धावा करून त्याचा फॉर्म परत मिळवला आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक ७१८ धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याची ऑसींविरुद्ध सरासरीही ५९.८ अशी सर्वाधिक आहे.  आजच्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा असणे साहजिकच आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल या सलामीवीरांना पुन्हा एकदा भारताला मोठी खेळी करून द्यावी लागणार आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांच्या पुनरागमनाने भारताची ताकद वाढली आहे. दिनेश कार्तिक की रिषभ पंत याच्या उत्तराची अनेकांना प्रतिक्षा होतीच. रोहित शर्मने दोन षटकार खेचताच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम त्याच्या नावावर होईल. न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्तीलने १७२ षटकार खेचले आहेत. 

ऑस्ट्रेलियाकडून आज टीम डेव्हिडचे पदार्पण होतंय... आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून डेव्हिडने उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने ८.५ कोटी रुपये मोजले होते. ( Tim David making his debut for Australia tonight against India). आजच्या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह व रिषभ पंत नाही खेळणार आहे. बुमराहला दुसऱ्या व  तिसऱ्या सामन्यात खेळवणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले. दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. हर्षल पटेल परतला असून अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांच्यावर फिरकीची जबाबदारी आहे.


कोण आहे टीम डेव्हिड?
 टीम डेव्हिड हा मूळचा सिंगापूरचा क्रिकेटपटू आहे. २५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असून डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला. सिंगापूरचा टीम डेव्हिड IPL 2021मध्ये RCB च्या संघाकडून खेळला आणि आयपीएल खेळणारा तो सिंगापूरचा पहिलाच खेळाडू ठरला. डेव्हिडला IPL मध्ये केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. बिग बॅश लीगमध्येही होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच रॉयल लंडन कप स्पर्धेतही त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ७० चेंडूत नाबाद १४० आणि ७३ चेंडूत १०२ धावा अशी दोन शतकं झळकावली आहेत. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ लिलावात डेव्हिडसाठी ८.५ कोटी रुपये मोजले. 

Web Title: ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming : Australia won the toss and decided to bowl first, Tim David debut; Jasprit Bumrah and Rishabh Pant are not playing tonight's match, know playing Xi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.