IND vs AUS T20 2022 Live : Kung Fu पांड्या! १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा, Hardik Pandya मोहाली 'गाजवली', Video 

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) मोहाली गाजवली... लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी भारतासाठी मजबूत पाया रचल्यानंतर हार्दिकने वादळी खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:11 PM2022-09-20T21:11:57+5:302022-09-20T21:12:42+5:30

whatsapp join usJoin us
ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming : Hardik Pandya scored 71* runs from just 30 balls including 7 fours and 5 sixes, hit 6,6,6 in the final 3 balls, Video  | IND vs AUS T20 2022 Live : Kung Fu पांड्या! १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा, Hardik Pandya मोहाली 'गाजवली', Video 

IND vs AUS T20 2022 Live : Kung Fu पांड्या! १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा, Hardik Pandya मोहाली 'गाजवली', Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) मोहाली गाजवली... लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी भारतासाठी मजबूत पाया रचल्यानंतर हार्दिकने वादळी खेळ केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. कॅमेरून ग्रीनने टाकलेल्या २०व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर हार्दिकने टोलावलेले षटकार लाजवाब होते.. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ट्वेंटी-२० ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. ( India vs Australia Live Match Scoreboard

नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. रोहित ( ११ ) व विराट ( २) धावांवर माघारी परतले. २ बाद ३५ वरून लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी भारताला डाव सावरला. लोकेश व सूर्यकुमार यादव यांची ४२ चेंडूंवरील ६८ धावांची भागीदारी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हेझलवूडला पुन्हा गोलंदाजीवर आणले आणि त्याने यश मिळवून दिले. लोकेश ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २०००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि भारताकडून हा टप्पा ओलांडणारा रोहित ( ३६३१) व विराट ( ३५८६) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.  Ind Vs Aus Live Scorecard, Ind Vs Aus 1st T20 Match


त्यानंतर सूर्याने सूत्र हाती घेतली, परंतु कॅमेरून ग्रीनने त्याला माघारी पाठवले. सूर्या २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला. अक्षर पटेल ( ६) व दिनेश कार्तिक ( ६) आज फार कमाल करू शकले नाही. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. हार्दिकने ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांना अक्षरशः छळले. हार्दिकने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकने आज मोहालीत वादळ आणताना भारताला ६ बाद २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. २०१३मध्ये भारताने राजकोट येथे ऑसींविरुद्ध ४ बाद २०२ धावा केल्या होत्या.   

Web Title: ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming : Hardik Pandya scored 71* runs from just 30 balls including 7 fours and 5 sixes, hit 6,6,6 in the final 3 balls, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.