Join us  

IND vs AUS T20 2022 Live : रोहित शर्मा, विराट कोहली Powerplay मध्येच माघारी परतले; KL Rahul ने अर्धशतक झळकावून सावरले, Video 

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 7:56 PM

Open in App

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना आज मोहाली येथे सुरू असून यजमानांना दोन मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा विराट २ धावांवर बाद झाला. रोहितने चांगली सुरुवात तर केली, परंतु पुन्हा एकदा मोठी खेळी त्याला करता आली नाही. त्याने एक षटकार खेचून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक १७१ षटकारांच्या मार्टिन गुप्तितच्या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली. 

जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु Jasprit Bumrah आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) सांगितले. ४३ महिन्यानंतर उमेश यादवचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये तो भारताकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत २३ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आणि त्यात भारताने १३-९ अशी आघाडीघेतली आहे. १ सामना अनिर्णीत राहिला. भारतात खेळलेल्या  ७ पैकी ३ सामनेच ऑस्ट्रेलियाला जिंकता आले आहेत.  

नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. रोहितने चौकार-षटकार खेचून आश्वासक सुरुवात केली, परंतु जोश हेझलवूडने  २१ धावांवर भारताला पहिला धक्का दिला. रोहित ११ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विराटच्या नावाचा गजर झाला. २०१६च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने मोहालीत दमदार खेळ केला होता. पण, आज त्याला २ धावांवर माघारी परतावे लागले. नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. २ बाद ३५ वरून लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी भारताला डाव सावरताना १० षटकांत २ बाद ८६ धावांपर्यंत पोहोचवले. लोकेशने ३२ चेंडूंत ट्वेंटी-२०तील १८वे अर्धशतक पूर्ण केले. 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्मालोकेश राहुल
Open in App