IND vs AUS T20 2022 Live : Jasprit Bumrah प्लेइंग इलेव्हनमध्ये का नाही?, कर्णधार रोहित शर्माच्या उत्तरानं बसेल धक्का 

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना आज मोहाली येथे खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:06 PM2022-09-20T19:06:21+5:302022-09-20T19:06:53+5:30

whatsapp join usJoin us
ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming :  Jasprit Bumrah is not yet 100% for this match. He may make an appearance in the remaining matches, Say Rohit Sharma  | IND vs AUS T20 2022 Live : Jasprit Bumrah प्लेइंग इलेव्हनमध्ये का नाही?, कर्णधार रोहित शर्माच्या उत्तरानं बसेल धक्का 

IND vs AUS T20 2022 Live : Jasprit Bumrah प्लेइंग इलेव्हनमध्ये का नाही?, कर्णधार रोहित शर्माच्या उत्तरानं बसेल धक्का 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना आज मोहाली येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु Jasprit Bumrah आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) सांगितले. ४३ महिन्यानंतर उमेश यादवचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये तो भारताकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता.
 


भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत २३ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आणि त्यात भारताने १३-९ अशी आघाडीघेतली आहे. १ सामना अनिर्णीत राहिला. भारतात खेळलेल्या  ७ पैकी ३ सामनेच ऑस्ट्रेलियाला जिंकता आले आहेत. आशिया चषक २०२२ स्पर्धेत विराटने शतकासह २७६ धावा करून त्याचा फॉर्म परत मिळवला आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक ७१८ धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याची ऑसींविरुद्ध सरासरीही ५९.८ अशी सर्वाधिक आहे.  आजच्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा असणे साहजिकच आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल या सलामीवीरांना पुन्हा एकदा भारताला मोठी खेळी करून द्यावी लागणार आहे.  

ऑस्ट्रेलियाकडून आज टीम डेव्हिडचे पदार्पण होतंय... आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून डेव्हिडने उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मोहम्मद शमीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उमेश यादवची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत निवड झाली आणि आज तो प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये आज स्थान नाही, तर अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी आहे.

रोहित शर्मा म्हणाला,  चुका सुधारण्यासाठी आता प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. मागील ६-८ महिन्यांत आम्ही सामना कसा जिंकावा याबद्दल बरेच काही शिकलो.  आशिया चषकातील निकालाने आम्हाला पुन्हा विचार करण्यास भाग पाडले. आम्हाला तगडा संघ मैदानावर उतरवायचा होता, परंतु दुखापतीमुळे शक्य नाही. हर्षल प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे, परंतु बुमराह आज नाही खेळणार. तो कदाचित दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात खेळेल. तो या सामन्यासाठी १०० टक्के तंदुरुस्त नाही.'

भारतीय संघ- रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार , हर्षल पटेल, उमेश यादव, युजवेंद्र चहल ( India: 1 Rohit Sharma (capt), 2 KL Rahul, 3 Virat Kohli, 4 Suryakumar Yadav, 5 Hardik Pandya, 6 Dinesh Karthik (wk), 7 Axar Patel, 8 Bhuvneshwar Kumar, 9 Harshal Patel, 10 Umesh Yadav, 11 Yuzvendra Chahal) 

Web Title: ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming :  Jasprit Bumrah is not yet 100% for this match. He may make an appearance in the remaining matches, Say Rohit Sharma 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.