IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पहिल्याच लढतीत रोहित शर्मा व विराट कोहली यांनी निराश केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांना पॉवर प्लेमध्ये माघारी पाठवले. पण, लोकेश राहुलने ( KL Rahul) जबरदस्त स्ट्राईक रेटने ऑसींची धुलाई केली आणि सूर्यकुमार यादवनेही चांगली फटकेबाजी केली. ही दोघं माघारी परतल्यानंतर भारताची धावगती किंचितशी मंदावली. पण, हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) अखेरच्या काही षटकांत ऑसींना धू धू धुतले... त्याने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला मोठी धावसंख्या उभी करून दिली.
KL Rahul ने माँस्टर सिक्स खेचला, रोहित शर्मा बघतच बसला; सलामीवीराने भारी पराक्रम नोंदवला, Video
नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. रोहितने चौकार-षटकार खेचून आश्वासक सुरुवात केली, परंतु जोश हेझलवूडने २१ धावांवर भारताला पहिला धक्का दिला. रोहित ११ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विराटच्या नावाचा गजर झाला. पण, आज त्याला २ धावांवर माघारी परतावे लागले. नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. २ बाद ३५ वरून लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी भारताला डाव सावरताना १० षटकांत २ बाद ८६ धावांपर्यंत पोहोचवले. लोकेशने ३२ चेंडूंत ट्वेंटी-२०तील १८वे अर्धशतक पूर्ण केले. IND vs AUS T20 2022, Ind vs Aus Live Match
लोकेश व सूर्यकुमार यादव यांची ४२ चेंडूंवरील ६८ धावांची भागीदारी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हेझलवूडला पुन्हा गोलंदाजीवर आणले आणि त्याने यश मिळवून दिले. लोकेश ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २०००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि भारताकडून हा टप्पा ओलांडणारा रोहित ( ३६३१) व विराट ( ३५८६) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला. Ind Vs Aus Live Scorecard, Ind Vs Aus 1st T20 Match
त्यानंतर सूर्याने सूत्र हाती घेतली, परंतु कॅमेरून ग्रीनने त्याला माघारी पाठवले. सूर्या २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला. भारताने १२६ धावांवर चौथा फलंदाज गमावला. रवींद्र जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान कमावणाऱ्या अक्षर पटेलला फलंदाजीला पुढच्या क्रमांकावर पाठवले, परंतु तो ६ धावांवर एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. हार्दिकने ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांना अक्षरशः छळले. दिनेश कार्तिकही ( ६) LBW झाला. त्यानंतर आलेल्या हर्षल पटेलने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. हार्दिकने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकने आज मोहालीत वादळ आणताना भारताला ६ बाद २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या.