IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना आज मोहाली येथे सुरू असून यजमानांना दोन मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा विराट २ धावांवर बाद झाला. रोहितने चांगली सुरुवात तर केली, परंतु पुन्हा एकदा मोठी खेळी त्याला करता आली नाही. त्याने एक षटकार खेचून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक १७१ षटकारांच्या मार्टिन गुप्तितच्या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली.
( India vs Australia Live Match Scoreboard )
नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. रोहितने चौकार-षटकार खेचून आश्वासक सुरुवात केली, परंतु जोश हेझलवूडने २१ धावांवर भारताला पहिला धक्का दिला. रोहित ११ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विराटच्या नावाचा गजर झाला. २०१६च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने मोहालीत दमदार खेळ केला होता. पण, आज त्याला २ धावांवर माघारी परतावे लागले. नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. २ बाद ३५ वरून लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी भारताला डाव सावरताना १० षटकांत २ बाद ८६ धावांपर्यंत पोहोचवले. लोकेशने ३२ चेंडूंत ट्वेंटी-२०तील १८वे अर्धशतक पूर्ण केले. Ind Vs Aus 1st T20 Match, IND vs AUS T20 2022 Live Screaming
लोकेश व सूर्यकुमार यादव यांची ४२ चेंडूंवरील ६८ धावांची भागीदारी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हेझलवूडला पुन्हा गोलंदाजीवर आणले आणि त्याने यश मिळवून दिले. लोकेश ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २०००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि भारताकडून हा टप्पा ओलांडणारा रोहित ( ३६३१) व विराट ( ३५८६) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.
त्यानंतर सूर्याने सूत्र हाती घेतली, परंतु कॅमेरून ग्रीनने त्याला माघारी पाठवले. सूर्या २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला. भारताने १२६ धावांवर चौथा फलंदाज गमावला. Ind Vs Aus Live Match Score, Ind Vs Aus Live Match
Web Title: ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming : KL Rahul became 3rd Indian batsman to complete 2000 runs in T20Is, KL Rahul smacks 85m six against Josh Hazlewood, Rohit Sharma's priceless reaction goes viral, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.