IND vs AUS 1st T20 Match Live Updates | विशाखापट्टनम : सुरूवातीपासून भारतावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देण्यात भारताला यश आले. रवी बिश्नोईने मॅथ्यू शॉर्टचा त्रिफळा काढून भारतीय चाहत्यांना जागे केले. आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. विशाखापट्टनम येथे होत असलेल्या या सलामीच्या सामन्यासाठी भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया कांगारूंशी भिडत आहे. नाणेफेक जिंकून यजमान संघाने पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
दरम्यान, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण करून कांगारूंनी भारताच्या युवा ब्रिगेडवर दबाव टाकला. भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने रवी बिश्नोईकडे चेंडू सोपवला आणि त्याने पहिली विकेट घेऊन प्रतिस्पर्धी संघाला झटका दिला. शॉर्ट ११ चेंडूत १३ धावा करून तंबूत परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या शॉर्टला चेंडूने फसवले अन् त्रिफळा उडाला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
मॅथ्यू वेड (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
Web Title: IND vs AUS 1st T20 Match Live Ravi Bishnoi with the first breakthrough, Matthew Short departs for 13 in 11 bowls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.