India Australia Nagpur TEST LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे. ऑस्ट्रेलियन (IND vs AUS) फिरकी आक्रमणाचे नेतृत्व नॅथन लियॉनच्या नेतृत्वात केले जाणार आहे. त्याच्या नावावर ११५ कसोटींमध्ये ४६० कसोटी विकेट्स आहेत. लिऑन निःसंशयपणे अशा अनुभवाने भारतासाठी सर्वात मोठा धोका असेल. पण, भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी लियॉन आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा मुकाबला करण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे. द्रविडने रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतरांना नागपूरमध्ये (IND vs AUS 1ली कसोटी) अधिकाधिक स्वीप शॉट्स खेळण्याची आणि गोलंदाजांवर काउंटर अॅटॅक करण्याची सूचना केली.
- प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण सत्रात रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंना स्वीप शॉट्ससह सामोरे जाण्याची सूचना केली.
- गेल्या मालिकेत रिषभ पंतने ऑस्ट्रेलियन संघाला त्याच पद्धतीने हाताळले होते. यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत संघाने पंतचे अनुकरण करावे अशी द्रविडची इच्छा आहे.
- २२ कसोटी सामन्यांमध्ये लियॉनने भारताविरुद्ध ३४ च्या सरासरीने ९४ बळी घेतले आहेत.
इतिहास सांगतो की SENA संघांनी (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) भारतात स्वीप शॉटचा अवलंब केला आहे, तर भारतीय संघाकडे रिषभ पंतसारखे आक्रमक प्रतिकार करणारे सूर्यकुमार यादव आणि इशान किशन आहेत.
गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर खेळणार नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून उत्कृष्ट फॉर्ममध्ये येत आहेत. मात्र, शुबमनला कसोटीचा अनुभव असल्याने त्याचा वरचष्मा दिसतो. भारताची आघाडीची फळी अलीकडच्या काळात फिरणाऱ्या चेंडूवर ढेपाळलेली पाहायला मिळाली. त्यामुळे खेळाडूंना आता अधिक स्वीप करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सूर्याने नेटवर उत्कृष्ट स्वीप शॉट्सचे कौशल्य दाखवले आहे.
पहिल्या कसोटीच्या आधी, भारतीय फलंदाज बहुतेक वेळा स्वीपचा सराव करताना आणि फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक डावपेच वापरताना दिसले. सुरुवातीच्या डावात फलंदाजी करणे फार कठीण जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत. रोहित शर्मा सध्या संपूर्ण सराव सत्रात स्वीप शॉट्स खेळताना दिसला.विराट कोहलीप्रमाणे तो चेंडू जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करत नव्हता; उलट तो हवेत फटके मारत होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"