Join us  

IND vs AUS, 1st Test : दिनेश कार्तिकने नागपूर कसोटीसाठी निवडली Playing XI; स्टार फलंदाजाला ठेवलं संघाबाहेर 

India vs Australia Live, India Playing XI 1st Test:  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 2:08 PM

Open in App

India vs Australia Live, India Playing XI 1st Test:  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल, याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा शुभमन गिल आणि ट्वेंटी-२० प्लेअर ऑफ दी ईअर सूर्यकुमार यादव यांच्यात एका जागेसाठी स्पर्धा आहे. यावरून मतमतांतर असताना भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik predicted XI for Nagpur Test) ने नागपूर कसोटीसाठी त्याची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. 

राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना

कार्तिकने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमग गिल याचे नाव दिसले नाही. त्याशिवाय कुलदीप यादव यालाही संधी दिली गेलेली नाही. कार्तिकने सलामीसाठी लोकेश राहुल व रोहित शर्मा यांना प्राधान्य दिले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली हा अपेक्षित क्रम आहे. कार्तिकने पाचव्या क्रमांकासाठी शुभमनला वगळून सूर्यकुमार यादवला पदार्पणाची संधी देण्याचा सल्ला दिला. यष्टिरक्षक म्हणून केएस भरत त्याच्या संघात आहे. रवींद्र जडेजा, आर अश्विन व अक्षर पटेल या फिरकीपटूंसह मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज या जलदगती गोलंदाजांचा कार्तिकच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.   

भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर यानेही संभाव्या प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्यात त्याने सूर्यकुमार यादव व  अक्षर पटेलला संधी दिली नाही. त्याच्या संघात रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद  सिराज यांना संधी दिली गेली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलदिनेश कार्तिक
Open in App