Join us  

IND vs AUS, 1st Test : रवी शास्त्रींच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उप कर्णधार 'ऑप्शन'मध्ये; रोहित शर्माला दिला विजयाचा मंत्र 

ndia Playing XI 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीला उद्यापासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 2:49 PM

Open in App

India vs Australia Live, India Playing XI 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीला उद्यापासून सुरूवात होत आहे. भारतीय संघ घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलून पाहुण्यांवर विजय मिळवण्यासाठी जोर लावणार आहेत. ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा पक्की करण्याचं टीम इंडियाचं ध्येय आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) कोणत्या अंतिम ११ खेळाडूंची निवड करतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, त्याआधी विविध मंडळींनी नागपूर कसोटीसाठी त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री  ( Ravi Shastri Playing XI) यांनी तर उप कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यालाच ऑप्शनमध्ये ठेवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख ठरली; भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी

रवी शास्त्रींनी भारतीय संघाला ही मालिका ४-० अशी जिंकण्यासाठी जोर लावा असा सल्ला दिला आहे.  २०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरसीच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात २०१८-१९ व २०२०-२१ झालेल्या  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला. २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या या मालिकेत विजय मिळवून जागतिक स्पर्धेची फायनल हेही ध्येय टीम इंडियासमोर आहे.रवी शास्त्री यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मासह ओपनिंगसाठी लोकेश राहुल व शुभमन गिल यांच्यापैकी एक अशा पर्याय ठेवला आहे. चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांचे स्थान कायम आहे. सूर्यकुमार यादवला त्यांनी पदार्पणाची संधी दिली आहे. तर यष्टिरक्षकासाठी केएस भरत व इशान किशन हे पर्यात त्यांनी ठेवलेत, रवींद्र जडेजा, आर अश्विन व कुलदीप यादव या तीन फिरकीपटूंसह मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज हे शास्त्रींच्या संघात आहेत.

कार्तिकने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमग गिल याचे नाव दिसले नाही. त्याशिवाय कुलदीप यादव यालाही संधी दिली गेलेली नाही. कार्तिकने सलामीसाठी लोकेश राहुल व रोहित शर्मा यांना प्राधान्य दिले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली हा अपेक्षित क्रम आहे. कार्तिकने पाचव्या क्रमांकासाठी शुभमनला वगळून सूर्यकुमार यादवला पदार्पणाची संधी देण्याचा सल्ला दिला. यष्टिरक्षक म्हणून केएस भरत त्याच्या संघात आहे. रवींद्र जडेजा, आर अश्विन व अक्षर पटेल या फिरकीपटूंसह मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज या जलदगती गोलंदाजांचा कार्तिकच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.   

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धारवी शास्त्री
Open in App