India Australia Nagpur TEST LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ फेब्रुवारीला नागपूर येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल याची पहिली झलक आज पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने खेळपट्टीची आज पाहणी केली. या कसोटीत पाहुण्यांची कोंडी करण्यासाठी भारतही सज्ज आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने तर रोहित शर्मा, विराट कोहली आदी फलंदाजांना आक्रमक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात रोहितनेही त्याचा गेम प्लान ठरवला आहे आणि त्यासाठी त्याने 'Fantastic Four' तयार ठेवले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात विराटचं नाव नाही.
सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला
नागपूरची खेळपट्टी पाहता भारतीय संघ पहिल्या कसोटीत चार फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव हे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांच्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी सज्ज असतील. ''आम्हाला आमच्या बलस्थानाचा सर्वाधिक वापर करायचा आहे आणि त्यासाठी फिरकी खेळपट्टी तयार केली आहे. फिरकीपटू हे आमची मोठी ताकद आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही सर्वोत्तम परिस्थिती तयार केली आहे,''असे संघातील सूत्रांनी सांगितले. पण, सामन्याच्या पूर्वसंध्येला संघ प्लेइंग इलेव्हनबाबतचा अंतिम निर्णय घेईल, हेही त्यांनी स्पष्ट केले. सध्यातरी चार फिरकीपटू खेळवण्याचा प्लान असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विन आणि जडेजा ही जोडी ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी ठरू शकते. या दोघांनी यापूर्वीही अनेक कसोटी सामने गाजवले आहेत. जडेजा दुखापतीतून सावरून कमबॅक करतोय आणि त्याने रणजी करंडक स्पर्धेत डावात सात विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. अक्षर व कुलदीप ही जोडी या दोघांना चांगला सपोर्ट देऊ शकते.
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव/ मोहम्मद सिराज
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"