Ind vs Aus Test: गुलाबी चेंडूवर ऑस्ट्रेलियाला कडवे आव्हान देण्यास भारतीय संघ सज्ज

Ind vs Aus Test: दिवस- रात्र कसोटी आजपासून: राहुलची निवड नाही; पंत, गिल यांच्याकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 01:10 AM2020-12-17T01:10:21+5:302020-12-17T07:00:32+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus 1st Test Indian team ready to challenge Australia in day night test | Ind vs Aus Test: गुलाबी चेंडूवर ऑस्ट्रेलियाला कडवे आव्हान देण्यास भारतीय संघ सज्ज

Ind vs Aus Test: गुलाबी चेंडूवर ऑस्ट्रेलियाला कडवे आव्हान देण्यास भारतीय संघ सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ॲडिलेड : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात आज गुरुवारपासून होत आहे. ॲडिलेड येथे गुलाबी चेंडूने विद्युत प्रकाशझोतात पहिला सामना खेळला जाणार आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ सज्ज असून यजमान संघ मात्र दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वपचा काढण्यास आसुसलेला असेल. त्यातही त्यांचे अनेक खेळाडू जखमी आहेत. कॅरी पॅकर यांनी १९७० च्या दशकात चॅनल नाईनवर दिवस-रात्र सामन्यांचे प्रमोशन केले. बिग बॉईज प्ले ॲड नाईट’ असे त्या विश्व मालिकेचे शीर्षक होते. २०२०मध्येही हेच शीर्षक साजेसे ठरते. कोहलीविरुद्ध स्टीव्ह स्मिथ, चेतेश्वर पुजाराविरुद्ध मार्नस लाबुशेन, जोश हेजलवूडविरुद्ध मोहम्मद शमी, पॅट कमिन्सविरुद्ध जसप्रीत बुमराह अशी चढाओढ यानिमित्त अनुभवायला मिळणार आहे. ईशांत शर्माची भारतासाठी तर डेव्हिड वॉर्नरची यजमान संघासाठी अनुपस्थिती लक्षवेधी ठरू शकेल. ऑस्ट्रेलियाला अधिक दिवस-रात्र सामने खेळण्याचा अनुभव असल्याने त्यांना घरच्या मैदानाचा लाभ मिळेल. अशा सामन्यात कुकाबुरा चेंडूचा वापर होत असल्याने दिवसा फलंदाज तर रात्रीच्या प्रकाशात गोलंदाज वर्चस्व जागवतात, असा अनुभव आहे. भारतीय संघाकडे विविध स्थानांसाठी अधिक पर्याय कधीही उपलब्ध नसतात.

स्मिथला फिटनेसची समस्या नाहीच
स्टीव्ह स्मिथ याला फिटनेससंदर्भात कुठलीही समस्या नाही. त्याच्या पाठीत दुखणे असले तरी तो भारताविरुद्ध खेळेल, असे कर्णधार पेन याने स्पष्ट केले. मंगळवारी स्ट्रेचिंगनंतर चेंडू उचलताना स्मिथच्या पाठीत दुखणे उमळले होते.

उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि  रविचंद्रन अश्विन.
ऑस्ट्रेलिया : टिम पेन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मायकेल नेसेर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड.

कॅमरून ग्रीनचे पदार्पण 
अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा कसोटी सामन्यांसाठी उपयुक्त खेळाडू असल्यामुळे भारताविरुद्ध गुलाबी चेंडूच्या कसोटीत पदार्पण करणार आहे. त्याने पहिल्या सराव सामन्यात शतक ठोकले होते. दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहचा चेंडू टोलवताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

शेरेबाजी नकोच : कोहली
कोरोनामुळे अनेक नव्या गोष्टी आत्मसात करायला मिळाल्यामुळे शेरेबाजीसारखी सवय व्यर्थ असल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी कसोटी मालिकेदरम्यान अशा व्यर्थ गोष्टींना थारा देणार नसल्याची ग्वाही त्याने दिली. प्रतिस्पर्धी कर्णधार टीम पेन याने मात्र गरजेनुसार शेरेबाजी करण्यास मागे राहणार नाही, असे म्हटले आहे. आक्रमक होण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करताना पेन म्हणाला,‘मैदानात काय घडते याची प्रतीक्षा करावी लागेल. मैदानावर आक्रमकता जाणवल्यास आम्ही शेरेबाजीचा वापर करू शकतो.’ कोहलीने मात्र चांगल्या हेतूसाठी अनावश्यक गोष्टींना मागे टाकण्याचे आवाहन केले.

पृथ्वी शॉ, साहा यांना संधी
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला शुभमान गिल याच्याऐवजी पहिल्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ याला तसेच यष्टिरक्षणासाठी रिद्धिमान साहा याला संधी मिळाली आहे. शुभमान गिल आणि लोकेश राहुल हे आमच्या रणनीतीचा भाग नसल्याचे कर्णधार कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात पंतने शतक ठोकले तर साहाने चिवट अर्धशतकी खेळी केली होती. व्यवस्थापनाने साहावर विश्वास टाकला आहे.

Web Title: Ind vs Aus 1st Test Indian team ready to challenge Australia in day night test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.