Join us  

KS Bharat Mother, IND vs AUS: आईची माया! सामन्याआधी मैदानात दिली 'जादू की झप्पी', केएस भरतही भावूक

भरतला ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या कसोटीत संघात मिळाले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 2:27 PM

Open in App

KS Bharat mother, IND vs AUS: ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर भारतीय संघात त्याच्या जागी कोण? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. या शर्यतीत इशान किशन आणि केएस भरत यांच्यात लढत होती. पंतप्रमाणेच आक्रमक खेळत असल्याने किशनला संधी मिळू शकते, असे मानले जात होते. पण विकेट किपिंगमध्ये त्याच्या जागी भरतला संघात स्थान देण्यात आले. त्यामुळेच भरतला ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळाले. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याने कसोटीत पदार्पण केले. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळायला सुरूवात केली.

खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला अशा यष्टीरक्षकाची गरज होती जो चांगली कामगिरी करू शकेल. फिरकीपटूंविरुद्ध तो चांगली कामगिरी करू शकेल. अशा खेळपट्ट्यांवर किपिंग करण्याची क्षमता त्याच्यात आहे. हे या बाबतीत भरतने अनेक वेळा सिद्ध केले आहे. त्यामुळे त्याला किशनपेक्षा पसंती दिली जात आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. या मालिकेत भरत टीम इंडियाचा एक भाग होता. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वृद्धीमान साहाला संधी मिळाली पण हा यष्टीरक्षक-फलंदाज जखमी झाला. अशा परिस्थितीत भरतला पर्याय म्हणून विकेटकीपिंग करण्याची संधी मिळाली. या सामन्यात विकेट कीपिंगही सोपी नव्हती, पण भरतने शानदार खेळ केला आणि काही नेत्रदीपक झेल टिपले. त्याची तीच कामगिरी त्याच्यासाठी कामी आली आणि त्यामुळेच या फिरकीपटूला अनुकूल खेळपट्टीवर संधी देण्यात आली.

IPL मध्ये भरतने आपल्या खेळाने छाप पाडली. तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता आणि गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्समध्ये आला होता. त्याला IPL मध्ये कमी संधी मिळाल्या. पण मिळालेल्या संधींमध्ये भरतने छाप पाडली. आजचा सामना सुरू होण्यापूर्वी भरतला एक खास भेट मिळाली. भरतची आई स्टेडियममध्ये उपस्थित होती आणि तिने सामन्यापूर्वी भरतला मिठी मारून आशीर्वाद दिले. भरत आणि त्याच्या आईचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

८६ सामन्यांचा अनुभव

भरत हा एक असा खेळाडू आहे जो दीर्घकाळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशकडून खेळतो. या संघाकडून खेळताना भरतने आतापर्यंत ८६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३७.९५ च्या सरासरीने ४७०७ धावा केल्या. त्याच्या नावावर ९ शतके आणि २७ अर्धशतके आहेत. त्याला ६४ List-A सामन्यांचा अनुभव आहे. या सामन्यांमध्ये भरतने ३३.६२ च्या सरासरीने १९५० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर सहा शतके आणि सहा अर्धशतके आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघरिषभ पंतइशान किशन
Open in App