Mohmmed Siraj, Umran Malik : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ नागपूर येथे दाखल झाला आहे. पण, भारतीय संघाच्या सरावापेक्षा वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचे सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दोन्ही खेळाडूंनी कपाळावर टिळा लावण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यावरून लोकं त्यांना वाईट म्हणत आहेत. त्याचवेळी काही लोकं त्यांच्या समर्थनातही उतरले आहेत.
श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. यासाठी टीम हॉटेलमध्ये पोहोचली होती. यात हॉटेलमध्ये प्रवेश करताना एकामागून एक खेळाडू कपाळावर टिळा लावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यात मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक यांनी टिळा लावण्यास नकार दिल्याचेही दिसत आहे. सिराजने टिळा लावणाऱ्या महिलेला नकार दिला. त्याचवेळी उम्रान मलिकही तेच केले.
यावरून काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत. काही त्यांच्या बचावात म्हणत आहेत की, सिराज आणि मलिक यांच्याशिवाय आणखी काही खेळाडू आहेत ज्यांनी टिळा लावलेला नाही. एका युजरने ट्विट केले की, "सिराज आणि उम्रान यांनी टिळा लावून घेतला नाही. एकूण ११ जण दारातून बाहेर आले, त्यापैकी ७ जणांनी टिळा लावला आणि ४ जणांनी नाही. सिराज, उम्रान, विक्रम राठोड आणि एका सपोर्ट स्टाफने टिळा लावला नाही. पण भक्तांना फक्त सिराज आणि उम्रान दिसले''
व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यास मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक यांच्याशिवाय विक्रम राठोड आणि हरिप्रसाद मोहन यांनीही टिळा लावण्यास नकार दिला. केवळ मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"