IND vs AUS, 1st Test : राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना

India vs Australia Live, India Playing XI 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:55 PM2023-02-08T12:55:12+5:302023-02-08T12:55:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS, 1st Test : Rahul Dravid wants to play Shubman GILL, Rohit Sharma inclined towards giving DEBUT to Surya at No 5, Debate in Indian camp | IND vs AUS, 1st Test : राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना

IND vs AUS, 1st Test : राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia Live, India Playing XI 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल, याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा शुभमन गिल आणि ट्वेंटी-२० प्लेअर ऑफ दी ईअर सूर्यकुमार यादव यांच्यात एका जागेसाठी स्पर्धा आहे. यावरूनच कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांच्यात मतमतांतर सुरू असल्याची बाब समोर येत आहे. 

शुभमन की सूर्यकुमार, उद्या कोण खेळणार? रोहित शर्माने स्पष्ट सांगितले, या खेळाडूला करतोय मिस

रोहित शर्मा व लोकेश राहुल सलामीला खेळणे निश्चित आहे. अशात रिषभ पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीचा जबाबदारी कोणाकडे सोपवावी यावरून सध्या चर्चा सुरू आहे. रोहित शर्माला काऊंटर-अटॅक करणारा फलंदाज सूर्यकुमार यादव हवा आहे, तर द्रविडला पाचव्या क्रमांकावर शुभमन गिल हवा आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमधील ही निवड सोपी नक्की नसेल. गिलने तिन्ही फॉरमॅटच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध  केले आहे आणि युवा खेळाडूने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील काही सामन्यांत शतकं झळकावली आहेत. सूर्यकुमार ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट आहेत आणि त्याला कसोटी पदार्पणाची संधी या मालिकेत मिळू शकते. रिषभच्या अनुपस्थितीत आक्रमक फलंदाजाची उणीव सूर्या भरून काढू शकतो.

''आमचे चारही फिरकीपटू उत्तम आहेत. जडेजा व अश्विन बरीच वर्ष सोबत खेळली आहेत. अक्षर व कुलदीप यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी  चांगली कामगिरी करून दाखवली आहे,''असे रोहितने कौतुक केले, परंतु या चौघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार का, याबाबत त्याने गुप्तता पाळली. श्रेयसच्या जागी कोण, यावर तो म्हणाला,''शुभमन गिल सध्या सर्वोच्च फॉर्मात आहे. त्याने अनेक शतकं झळकावली आहेत. दुसरीकडे सूर्यकुमार यादवनेही त्याचे कौशल्य दाखवून दिले आहे. पण, आम्ही अद्याप कोणाला खेळवायचे याचा निर्णय घेतलेला नाही. ''

संभाव्य  प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा
लोकेश राहुल
चेतेश्वर पुजारा
 विराट कोहली
शुभमन गिल/सूर्यकुमार यादव
 केएस भरत ( यष्टिरक्षक) 
रवींद्र जडेजा
आर अश्विन
अक्षर पटेल/कुलदीप यादव
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs AUS, 1st Test : Rahul Dravid wants to play Shubman GILL, Rohit Sharma inclined towards giving DEBUT to Surya at No 5, Debate in Indian camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.