अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वारसदार रिषभ पंत असल्याचे बोलले जाते. या गोष्टीचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आला. पंतने यावेळी यष्टीरक्षण करताना आर. अश्विनला एक खास सल्ला दिला.
इशांत शर्माने आरोन फिंचला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यावेळी पीटर हँड्सकॉम्ब संघासाठी धावून आला, त्याने पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे सावरलेला नव्हता. त्यावेळी हेडने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हेडने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावांची खेळी साकारली. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद 191अशी मजल मारली आहे.
हेड दमदार फलंदाजी करत असताना ही गोष्ट ५४व्या षटकात घडली.अश्विन यावेळी भेदक मारा करत होता. हेडला यावेळी धावा घेण्यात समस्या जाणवत होती. त्यावेळी पंत अश्विनला म्हणाला की, " हेड आता आखूड टप्प्याच्या चेंडूची वाट पाहत आहे. तसा चेंडू मिळाला तर तो मोठा फटका मारेल, त्यामुळे त्याला आखूड टप्प्याचा चेंडू देऊ नकोस. "
हा पाहा व्हिडीओ