Join us  

IND vs AUS 1st Test : शुभमन की सूर्यकुमार, उद्या कोण खेळणार? रोहित शर्माने स्पष्ट सांगितले, या खेळाडूला करतोय मिस

India Australia Nagpur TEST LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 12:26 PM

Open in App

India Australia Nagpur TEST LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे. ऑस्ट्रेलियन (IND vs AUS) संघही भारताला जशासतसे उत्तर देण्याची भाषा करत आहे. घरच्या परिस्थितीचा फायदा उचलत भारतीय संघ फिरकीपटूंना पोषक खेळपट्टी तयार करेल, यात शंकाच नाही. पण, कांगारूंही नॅथन लियॉनसह अन्य फिरकीपटू घेऊन तयार आहेत. भारतासमोर खरी समस्या फलंदाजीतील निवडीवर आहे. श्रेयस अय्यर जखमी झाल्याने त्याच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळेल हा वादाचा मुद्दा ठरला आहे. शुभमन गिल आणि  सूर्यकूमार यादव यांच्यात स्पर्धा आहे. त्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) आज त्याबाबत संकेत दिले आहेत.

मी जाऊन त्याच्या कानाखाली खेचेन! कपिल देव अचानक टीम इंडियाच्या खेळाडूवर संतापले

यावेळी रिषभ पंतची उणीव जाणवत असल्याचे रोहितने मान्य केले. तो म्हणाला,''आम्हाला रिषभ पंतची उणीव जाणवतेय, परंतु ती भरून काढण्यासाठी सक्षम खेळाडू आमच्याकडे आहेत. आम्ही फलंदाजांना त्यांची जबाबदारी समजावून सांगितली आहे आणि  ठरलेली रणनिती यशस्वी होईल, अशी आशा आहे. पहिल्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी आम्ही सुरू करणार आहोत. आमचे सर्व लक्ष सामन्यावर आहे आणि सर्व २२ खेळाडू उद्या दर्जेदार क्रिकेट खेळण्यासाठीच मैदानावर उतरणार आहेत.''

''आमचे चारही फिरकीपटू उत्तम आहेत. जडेजा व अश्विन बरीच वर्ष सोबत खेळली आहेत. अक्षर व कुलदीप यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी  चांगली कामगिरी करून दाखवली आहे,''असे रोहितने कौतुक केले, परंतु या चौघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार का, याबाबत त्याने गुप्तता पाळली. श्रेयसच्या जागी कोण, यावर तो म्हणाला,''शुभमन गिल सध्या सर्वोच्च फॉर्मात आहे. त्याने अनेक शतकं झळकावली आहेत. दुसरीकडे सूर्यकुमार यादवनेही त्याचे कौशल्य दाखवून दिले आहे. पण, आम्ही अद्याप कोणाला खेळवायचे याचा निर्णय घेतलेला नाही. ''

''प्लेइंग इलेव्हन निवडणे आव्हानात्कम असते. प्रत्येक खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक सामन्यानुसार विचार करावा लागेल आणि त्यानुसारच संघ निवड करावी लागेल. याची खेळाडूंनाही कल्पना आहे आणि मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच याबाबत त्यांच्याशी चर्चा केली गेली आहे,''असे रोहित म्हणाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माशुभमन गिलसूर्यकुमार अशोक यादव
Open in App