IND vs AUS 1st Test: रोहित नव्हे, तर पहिल्या कसोटीत हे ३ भारतीय खेळाडू ठरतील 'ट्रम्प कार्ड'; ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवणार 

India vs Australia,1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 03:06 PM2023-02-06T15:06:06+5:302023-02-06T15:07:47+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 1st Test : Three Indian players virat Kohli, Ravindra Jadeja and Shubman Gill will prove to be trump card against Australia, Check who  | IND vs AUS 1st Test: रोहित नव्हे, तर पहिल्या कसोटीत हे ३ भारतीय खेळाडू ठरतील 'ट्रम्प कार्ड'; ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवणार 

IND vs AUS 1st Test: रोहित नव्हे, तर पहिल्या कसोटीत हे ३ भारतीय खेळाडू ठरतील 'ट्रम्प कार्ड'; ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia,1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही मालिका टीम इंडियासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल (WTC Final 2023) च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी तयार आहे आणि टीम इंडियाचे हे तीन खेळाडू कांगारूंविरुद्ध पहिल्या कसोटीत ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतात.  

दीड वर्ष संघासोबत फिरला अन् आता मिळणार पदार्पणाची संधी; KL Rahulबाबत BCCIचा मोठा निर्णय

गेल्या तीन वर्षांपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेवर भारताचे वर्चस्व राहिले आहे. भारताने २०१७, २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका जिंकल्या आहेत. भारताने यंदाच्या चार सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाचा ४-० असा पराभव केला तर त्यांची टक्केवारी ६८.०६ अशी होईल. त्यानंतर WTC फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदाचा सामना होईल. पहिल्या कसोटीत विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल हे तीन खेळाडू  ट्रम्प कार्ड ठरू शकतील.

विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. बराच काळ फॉर्ममध्ये चढ-उतार पाहिल्यानंतर कोहलीने ट्वेंटी-२० आणि वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावे. कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्याच्या कसोटी शतकाचा दुष्काळ संपेल, अशी चाहत्यांना आशा आहे. पाहुण्या संघाविरुद्ध कोहलीने २० सामन्यांमध्ये ४८.०५ च्या सरासरीने १६८२ धावा केल्या आहेत. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकं आहेत.


या यादीत दुसरे नाव टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाचे आहे. जो केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवू शकतो. दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर राहिल्यानंतर जडेजा पाहुण्या संघाचा तणाव वाढवण्याचे काम करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी जडेजा देशांतर्गत सामने खेळला होता. सौराष्ट्र संघाकडून खेळताना त्याने तामिळनाडूविरुद्ध ५३ धावांत सात बळी घेतले. जडेजाने कांगारूंविरुद्ध १२ सामन्यांत  ६३ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजा २०१७ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्यादरम्यान त्याने चार सामन्यांत २५ विकेट घेतल्या आमि दोन अर्धशतकं झळकावली. त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 

टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक झळकावले. जानेवारीमध्ये त्याने वन डेत द्विशतक झळकावले आणि नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० मालिकेतही त्याने शतक झळकावले. मागील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत गिलने तीन सामन्यांमध्ये ५१.८०च्या सरासरीने २५९ धावा केल्या. त्याने गाबा कसोटीत ९१ धावांची सर्वोत्तम धावसंख्या केली. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs AUS 1st Test : Three Indian players virat Kohli, Ravindra Jadeja and Shubman Gill will prove to be trump card against Australia, Check who 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.