ठळक मुद्देकोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 9 सामने खेळायला लागले.सर ब्रॅडमन यांना ऑस्ट्रेलियामध्ये हजार धावा पूर्ण करण्यासाठी 10 कसोटी सामने खेळावे लागले होते. 1931 साली सर ब्रॅडमन यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. हा विक्रम करताना तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिगज्जाच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचबरोबर कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकत सर्वोत्तम फलंदाज होण्याचाही मान पटकावला आहे.
कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 9 सामने खेळायला लागले. सर ब्रॅडमन यांना ऑस्ट्रेलियामध्ये हजार धावा पूर्ण करण्यासाठी 10 कसोटी सामने खेळावे लागले होते. 1931 साली सर ब्रॅडमन यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने काही धावा करत महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये स्थान पटकावले आहे. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, परंतु कोहलीसाठी हा दौरा संस्मरणीय ठरला होता. त्याने त्या दौऱ्यात खोऱ्याने धावा केल्या होत्या. या गोष्टीचा फायदा त्याला या दौऱ्यातही झाला आहे.
आठ धावा करत कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीव्ही एस लक्ष्मण व राहुल द्रविड यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करून यजमानांना धोक्याचा इशारा दिला होता. कोहलीने घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 92च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. 2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीने 8 डावांत 692 धावा केल्या होत्या. स्टीव्हन स्मिथनंतर ( 769) त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. त्या मालिकेत कोहलीने चार शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं होतं.
Web Title: IND vs AUS 1st Test: virat Kohli break record of sir Don Bradman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.