Join us  

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला! बुमराह OUT प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री; कांगारूंनी कॅप्टन बदलला

IND vs AUS 2nd ODI : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वन डे सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 1:03 PM

Open in App

IND vs AUS 2nd ODI live updates in marathi : सलामीच्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारल्यानंतर मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने आज भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. आज दुसरा सामना खेळवला जात असून जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान दिले आहे. वैयक्तिक कारणामुळे बुमराहने माघार घेतली असल्याचे बीसीसीआयने सांगितले. आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा. 

खरं तर ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. आज मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात असून टीम इंडिया रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलच्या नेतृत्वात मैदानात आहे. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. 

अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघस्टीव्हन स्मिथजसप्रित बुमराह