India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जात आहे. काल येथे जोरदार पाऊस पडल्यानं आजच्या सामन्यातवर संकट घोंगावत होतं, परंतु सकाळपासून पावसाने दडी मारली आहे आणि आकाशही मोकळं दिसत आहे. भारताने पहिली वन डे जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि आज बाजी मारून मालिका विजयाचा निर्धार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) या सामन्यात परल्याने आज कोणाला बाहेर बसवले जाते याची उत्सुकता आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वन डे सामन्यातील १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांना अपयश आले होते. लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी करताना हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांच्यासह दमदार भागीदारी करून भारताचा विजय पक्का केला. मोहम्मद शमी व मोहम्मद सिराजने गोलंदाजीत कमाल दाखवताना ऑसींना स्वस्तात गुंडाळले. मुंबईतील विजय हा भारताचा वन डे तील सलग आठवा विजय ठरला आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाची ६ सामन्यांची विजयी मालिका रोखली.
लोकेश राहुलने ५० वन डे डावांत १९४५ धावा केल्या आहेत आणि त्याने आज ५५ धावा केल्यास तो भारताकडून सर्वात जलद २००० धावा करणारा ( शिखर धवन - ४८ डाव) फलंदाज ठरेल. स्टीव्ह स्मिथने आज ६१ धावा केल्यास तो वन डेत ५००० धावा पूर्ण करेल. स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल बाहेर बसावे लागले आहे. इशान किशन आणि शार्दूल ठाकूर यांना बाहेर बसावे लागले आहे.. रोहित व अक्षर पटेल यांची एन्ट्री झाली आहे.
भारतीय़ संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल.