India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा यजमानांचे धाबे दणाणून सोडले आहे. स्टार्कने टीम इंडियाच्या पहिल्या चार फलंदाजांना बाद केले आणि त्यानंतर सीन एबॉट व नॅथन एलिसने धक्के देताना ७१ धावांत ६ फलंदाज माघारी पाठवले. कर्णधार स्टीव्ह स्मिथने ( Steve Smith) दोन अविश्वसनीय झेल घेताना रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना माघारी पाठवले.
नाद खुळा! स्टीव्ह स्मिथने सामन्यात दुसरा अफलातून झेल टिपला, भारताचा निम्मा संघ ४९ धावांत तंबूत परतला
मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात शुबमन गिलला माघारी जाण्यास भाग पाडले. पॉईंडवर मार्नस लाबुशेनने झेल घेतला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी सुरेख फटकेबाजी मारून भारतावरील दडपण कमी केलं... पण, मिचेल स्टार्कने पुन्हा घात केला. त्याच्या भन्नाट चेंडूवर रोहितला ( १३) माघारी जावे लागले आणि स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने तितकाच अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव ( ०) LBW झाला.
स्टार्कने मागील सामन्यातील स्टार लोकेश राहुलला ( ९) पायचीत केले. लोकेशने DRS घेतला, परंतु तो वाया गेला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला ( १) सीन एबॉटने माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथने हवेत झेप घेताना एका हाताने अफलातून झेल टिपला अन् भारताचा निम्मा संघ ४९ धावांत माघारी परतला. विराट एका बाजूने भारताची खिंड लढवत होता आणि त्याला रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. या दोघांनी ३६ चेंडूंत २२ धावांची भागीदारी केली, परंतु नॅथन एलिसने भारताला मोठा धक्का दिला. ३५ चेंडूंत ३१ धावा करणाऱ्या विराटला त्याला LBW केले.
भारताचे ६ फलंदाज ७६ धावांवर माघारी परतले. अम्पायरने बाद दिल्यानंतर विराटने DRS घेऊ का अशी विचारणा जडेजाकडे केली, परंतु त्याने त्याचा काही उपयोग होणार नाही, याअर्थीने मान हलवली. DRS घेऊनही विराट नाबाद झाला नसता हे रिप्लेतून नंतर स्पष्ट झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"