IND vs AUS 2nd ODI Live : रोहितचा स्लीपमध्ये स्मिथने भन्नाट झेल घेतला, मिचेल स्टार्कने पुन्हा सूर्यकुमारला Golden Duck वर बाद केला, Video 

India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 02:07 PM2023-03-19T14:07:24+5:302023-03-19T14:08:16+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Rohit Sharma dismissed for 13, 2nd consecutive golden duck for Suryakumar Yadav, India 3 for 32 runs, Video  | IND vs AUS 2nd ODI Live : रोहितचा स्लीपमध्ये स्मिथने भन्नाट झेल घेतला, मिचेल स्टार्कने पुन्हा सूर्यकुमारला Golden Duck वर बाद केला, Video 

IND vs AUS 2nd ODI Live : रोहितचा स्लीपमध्ये स्मिथने भन्नाट झेल घेतला, मिचेल स्टार्कने पुन्हा सूर्यकुमारला Golden Duck वर बाद केला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जात आहे. काल येथे जोरदार पाऊस पडल्यानं आजच्या सामन्यातवर संकट घोंगावत होतं, परंतु सकाळपासून पावसाने दडी मारली आहे आणि आकाशही मोकळं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल केले आहेत. स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) पुन्हा घात केला. शुबमन गिल, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना त्याने माघारी पाठवले. सूर्याकुमार सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला. 

लोकेश राहुलने ५० वन डे डावांत १९४५ धावा केल्या आहेत आणि त्याने आज ५५ धावा केल्यास तो भारताकडून सर्वात जलद २००० धावा करणारा ( शिखर धवन - ४८ डाव) फलंदाज ठरेल. स्टीव्ह स्मिथने आज ६१ धावा केल्यास तो वन डेत ५००० धावा पूर्ण करेल. इशान किशन आणि  शार्दूल ठाकूर यांना बाहेर बसावे लागले आहे.. रोहित व अक्षर पटेल यांची एन्ट्री झाली आहे. मिचेल स्टार्कने पहिल्या वन डे सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले होते आणि आजही तसेच झाले. स्टार्कने पहिल्याच षटकात शुबमन गिलला माघारी जाण्यास भाग पाडले. पॉईंडवर मार्नस लाबुशेनने झेल घेतला.

रोहित शर्मा व विराट कोहली यांनी सुरेख फटकेबाजी मारून भारतावरील दडपण कमी केलं... पण, मिचेल स्टार्कने पुन्हा घात केला. त्याच्या भन्नाट चेंडूवर रोहितला ( १३) माघारी जावे लागले आणि स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने तितकाच अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव ( ०) LBW झाला. 


 

भारतीय़ संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Rohit Sharma dismissed for 13, 2nd consecutive golden duck for Suryakumar Yadav, India 3 for 32 runs, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.