Join us  

IND vs AUS 2nd ODI Live : नाद खुळा! स्टीव्ह स्मिथने सामन्यात दुसरा अफलातून झेल टिपला, भारताचा निम्मा संघ ४९ धावांत तंबूत परतला, Video 

 ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल केले आहेत. स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) पुन्हा घात केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 2:32 PM

Open in App

India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जात आहे.  ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल केले आहेत. स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) पुन्हा घात केला. शुबमन गिल, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना त्याने माघारी पाठवले. सूर्याकुमार सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला. 

रोहितचा स्लीपमध्ये स्मिथने भन्नाट झेल घेतला, स्टार्कने पुन्हा सूर्यकुमारला Golden Duck वर बाद केले

इशान किशन आणि  शार्दूल ठाकूर यांना बाहेर बसावे लागले आहे.. रोहित व अक्षर पटेल यांची एन्ट्री झाली आहे. मिचेल स्टार्कने पहिल्या वन डे सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले होते आणि आजही तसेच झाले. स्टार्कने पहिल्याच षटकात शुबमन गिलला माघारी जाण्यास भाग पाडले. पॉईंडवर मार्नस लाबुशेनने झेल घेतला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी सुरेख फटकेबाजी मारून भारतावरील दडपण कमी केलं... पण, मिचेल स्टार्कने पुन्हा घात केला. त्याच्या भन्नाट चेंडूवर रोहितला ( १३) माघारी जावे लागले आणि स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने तितकाच अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव ( ०) LBW झाला.  स्टार्कचा भेदक मारा येथेच थांबला नाही.. मिचेल स्टार्कने मागील सामन्यातील स्टार लोकेश राहुलला ( ९) पायचीत केले. लोकेशने DRS घेतला, परंतु तो वाया गेला. भारताने ४८ धावांत ४ फलंदाज गमावले. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला ( १) सीन एबॉटने माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथने हवेत झेप घेताना एका हाताने अफलातून झेल टिपला अन् भारताचा निम्मा संघ ४९ धावांत माघारी परतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथहार्दिक पांड्या
Open in App