Jasprit Bumrah Out, IND vs AUS 2nd ODI Live Updates: भारतीय संघाची वेगवान तोफ म्हणजेच जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वन डे मधून माघार घेतली आहे. सुमारे वर्षभराच्या दुखापत व विश्रांतीनंतर बुमराह आयर्लंड दौऱ्यातून क्रिकेटमध्ये परतला. त्यानंतर आशिया चषकातही त्याने चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत बुमराहची निवड करण्यात आली होती. पहिल्या सामन्यात खेळल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात बुमराहने संघातून माघार घेतली. बुमराहच्या जागी बीसीसीआयने बदली खेळाडूही मागवला. पण बुमराहच्या माघारीचे नक्की कारण काय, याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराहची माघार का? बदली खेळाडू कोण?
जसप्रीत बुमराह भारतीय संघासोबत दुसऱ्या वन डे सामन्यासाठी इंदूरला गेला नाही. त्या वेळेत बुमराह आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेला आहे. त्यामुळे त्याला एक छोटी विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी मुकेश कुमार बदली खेळाडू म्हणून संघात सामील झाला आहे. पण बुमराह राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या वन डे सामन्यासाठी संघात येणार आहे.
बुमराहच्या जागी मुकेश कुमारला बदली खेळाडू म्हणून घेतले असले तरी प्लेईंग ११ मध्ये बुमराहच्या जागी प्रसिध कृष्णाची वर्णी लागली. त्यामुळे आजच्या सामन्यात शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा हे तीन वेगवान गोलंदाज आहेत.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ- लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- डेव्हिड वॉर्नर, मॅट शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सीन अबॉट, अडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन