Revised Target for Australia, IND vs AUS 2nd ODI Live Updates: भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावा केल्या. शुबमन गिल, श्रेयस अय्यरची शतकं आणि सूर्यकुमार यादव, कर्णधार केएल राहुलची अर्धशतकं यांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ९ षटकांत २ बाद ५६ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. आता खेळ पुन्हा सुरू झाला असून सामना ३३ षटकांचा असणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नवं टार्गेट मिळालं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्यांची फलंदाजीही सुरूवातीला बोथट दिसली. ४०० धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात मोहम्मद शमीला मॅथ्यू शॉर्टने दोन चौकार लगावले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आक्रमक खेळ करणार हे निश्चित होते. पण तशातच दुसरे षटक घेऊन प्रसिध कृष्णा आला. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टला तर तिसऱ्या चेंडूवर कर्णधार स्टीव्ह माघारी पाठवलं. पण डेव्हिड वॉर्नर संघाला स्थैर्य दिलं. यानंतर पाऊस आल्याने सामना ३३ षटकांचा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आता ३३ षटकांच्या खेळात ३१७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
त्याआधी, स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने प्रथम भारताला फलंदाजीची संधी दिली. मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शुबमन गिल यांच्यात द्विशतकी भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने त्याने १०५ धावा केल्या. तर शुबमन गिलने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या बळावर १०४ धावा केल्या. या दोघांनंतर कर्णधार केएल राहुलने डाव सांभाळला. इशान किशनने त्याला चांगली साथ दिली. पण किशन १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत ३१ धावांवर बाद झाला. मग सूर्यकुमार मैदानात आला. राहुल ३८ चेंडूत ५२ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही ९ चेंडूत १३ धावा केल्या. त्यामुळे भारताला ३९९ धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने २ तर हेजलवूड, सीन अबॉट आणि अडम झम्पा यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.
Web Title: IND vs AUS 2nd ODI Live Updates Play resumes after Rain as Australia revised target is 317 in 33 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.