R Ashwin, IND vs AUS 2nd ODI Live Updates: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांची मजल मारली. शुबमन गिलच्या १०४, श्रेयस अय्यरच्या १०५ आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७२ धावांमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावसाने ऑस्ट्रेलियाचा डाव रोखला. पावसानंतर ऑस्ट्रेलियाला ३३ षटकांत ३१७ धावांचे नवे आव्हान मिळाले. पण पावसानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूंग लावला.
४०० धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या षटकात दोन धक्के बसले. प्रसिध कृष्णाने आधी मॅथ्यू शॉर्टला ९ धावांवर तर स्टीव्ह स्मिथला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले. डेव्हिड वॉर्नरने संघर्ष केला. ९ षटकानंतर पावसाचा व्यत्यय आला. पाऊस थांबल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे नवे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाज केवळ हजेरी लावून तंबूत परतले. रविचंद्रन अश्विनने आधी मार्नस लाबूशेनला २७ धावांवर माघारी पाठवले. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक ठोकले. पण अश्विनने वॉर्नर (५३) आणि इग्लिश (६) दोघांना एकाच षटकात बाद केले. त्यामुळे १०१ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ५ बळी बाद झाले.
- अश्विनचा पहिला बळी
- अश्विनचा दुसरा बळी
- अश्विनचा तिसरा बळी
अश्विनने केला मोठा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. त्याने आज घेतलेल्या ती बळींसह एकूण १४४ बळी टिपले. याआधी १४२ बळींसह अनिल कुंबळे या यादीत अव्वल होता. पण अश्विनने आज त्याचा विक्रम मोडला.
तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शुबमन गिल यांच्यात द्विशतकी भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने त्याने १०५ धावा केल्या. तर शुबमन गिलने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या बळावर १०४ धावा केल्या. या दोघांनंतर कर्णधार केएल राहुलने डाव सांभाळला. इशान किशनने त्याला चांगली साथ दिली. पण किशन १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत ३१ धावांवर बाद झाला. मग सूर्यकुमार मैदानात आला. राहुल ३८ चेंडूत ५२ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही ९ चेंडूत १३ धावा केल्या. त्यामुळे भारताला ३९९ धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने २ तर हेजलवूड, सीन अबॉट आणि अडम झम्पा यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.
Web Title: IND vs AUS 2nd ODI Live Updates R Ashwin triple blast takes 3 wickets dismissing David Warner Marnus Labuschange
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.