VIDEO: "तू माझ्याशी लग्न करशील का?", चाहत्यानं गुलाब देताच रोहितनं दिली भन्नाट प्रतिक्रिया 

rohit sharma funny video with fan: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 02:29 PM2023-03-19T14:29:12+5:302023-03-19T14:30:02+5:30

whatsapp join usJoin us
ind vs aus 2nd odi Rohit Sharma asks fan Will you marry me after receiving rose, video goes viral on social media  | VIDEO: "तू माझ्याशी लग्न करशील का?", चाहत्यानं गुलाब देताच रोहितनं दिली भन्नाट प्रतिक्रिया 

VIDEO: "तू माझ्याशी लग्न करशील का?", चाहत्यानं गुलाब देताच रोहितनं दिली भन्नाट प्रतिक्रिया 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Proposes A Fan । विशाखापट्टणम : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची लोकप्रियता खूप आहे. आपल्या लाडक्या हिटमॅनची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. याचाच एक प्रत्यय देणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. खरं तर सामान्य चाहते सहसा खेळाडूंपर्यंत पोहोचत नाहीत. पण रोहित शर्माच्या या सुपर फॅनला हिटमॅन पाहायला मिळाले आणि त्याला भारतीय कर्णधाराकडून आनंददायक प्रतिक्रिया देखील मिळाली. 

मेव्हन्याचे लग्न असल्यामुळे संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वन डे ला गैरहजर होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्लू विशाखापट्टणममधील दुसऱ्या वनडेच्या आधी स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना, एक चाहता गुलाब घेऊन त्याच्या आवडत्या खेळाडूची वाट पाहत होता. संबंधित चाहत्याचा आत जात असताना रोहितशी सामना झाला. चाहत्याने भारतीय कर्णधाराला गुलाब दिला तेव्हा रोहितने मजेशीरपणे त्याला विचारले की, "तू माझ्याशी लग्न करशील का?".

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी अवघड प्रयत्न करावे लागले. मिचेल मार्शने केलेल्या 81 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे मेन इन ब्लू संघावर लवकर दबाव आला. पण लवकरच भारतीय गोलंदाजांनी मार्शच्या धोक्यापासून बचाव केला आणि पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला 35 षटकांत अवघ्या 188 धावांवर सर्वबाद केले.

भारताची विजयी सलामी 
189 या धावसंख्येचा पाठलाग भारतीय संघासाठी सोपा नव्हता. कारण ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करून भारताला मोठे धक्के दिले. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने शुबमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना स्वस्तात बाद केले. एक अपमानजनक पराभव टाळताना लोकेश राहुलने 91 चेंडूत महत्त्वपूर्ण 75 धावा करून टीम इंडियाला सावरले. राहुल, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या खेळीच्या जोरावर भारताने पाच गडी राखून विजयी सलामी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: ind vs aus 2nd odi Rohit Sharma asks fan Will you marry me after receiving rose, video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.