IND vs AUS 2nd T20I Live : युवा खेळाडूंना सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) पॉवप प्लेमध्ये आपला दम दाखवला अन् मोठा विक्रम केला.
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार! मोठ्या खेळाडूला RCBकडे सोपवले अन्....
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेत ऑस्ट्रेलियावर आधीच दडपण वाढवले आहे. आज ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सीन अबॉटने टाकलेल्या चौथ्या षटकात यशस्वीने ४,४,४,६,६ अशा २४ धावा चोपल्या. यशस्वीने आज स्टेडियम दणाणून सोडताना २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. नॅथन एलिसने हे वादळ रोखले. यशस्वी २५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांवर झेलबाद झाला.
यशस्वी व ऋतुराज यांनी ५.५ षटकांत ७७ धावांची भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम यशस्वीने नावावर केला. त्याने रोहित शर्माचा ( नाबाद ५० वि. न्यूझीलंड, २०२०) आणि लोकेश राहुल ( ५० वि. स्कॉटलंड, २०२१) यांचा विक्रम मोडला. यशस्वी बाद झाल्यानंतर इशान किशन व ऋतुराज यांनी धावांचा वेग कायम राखला अन् भारताला शतकीपार पोहोचवले.