IND vs AUS 2nd T20I : Rohit Sharma चे 'ते' वागणे महेंद्रसिंग धोनीलाही नाही पटले, कॅप्टनला दोन उपदेशाचे डोस दिले

India vs Australia 2nd T20I : भारतीय संघाला २०८ धावा करूनही गोलंदाजांच्या अपयशामुळे पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात  हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 07:41 PM2022-09-23T19:41:18+5:302022-09-23T19:41:50+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd T20I : Team India ex-captain MS Dhoni calls for Rohit Sharma to keep his cool, says ‘Getting angry does not help matters’ | IND vs AUS 2nd T20I : Rohit Sharma चे 'ते' वागणे महेंद्रसिंग धोनीलाही नाही पटले, कॅप्टनला दोन उपदेशाचे डोस दिले

IND vs AUS 2nd T20I : Rohit Sharma चे 'ते' वागणे महेंद्रसिंग धोनीलाही नाही पटले, कॅप्टनला दोन उपदेशाचे डोस दिले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd T20I : भारतीय संघाला २०८ धावा करूनही गोलंदाजांच्या अपयशामुळे पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात  हार मानावी लागली. त्या लढतीत कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) यष्टीरक्षक दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) याचा जबडा पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांना रोहितचे हे वागणे आवडले नाही, तर काहींनी तो भंकस करत असल्याचे सांगितले. रोहितच्या या कृतीवरून सोशल मीडियावर दोन गट पडले असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याने हिटमॅनला उपदेशाचे दोन बोल सुनावले आहेत.

रोहित शर्माचा पारा चढला! सामन्यातील षटकं कमी होणार; जाणून घ्या अंतिम निर्णय किती वाजता घेणार

मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या डावातील १२व्या षटकात हा प्रसंग घडला. उमेश यादवने टाकलेला चेंडू स्टीव्ह स्मिथच्या बॅटची किनार घेत यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. मैदानावरील अम्पायरने स्मिथला नाबाद दिले आणि भारताने DRS घेतला व स्मिथची विकेट मिळवली. याच षटकात उमेशने ग्लेन मॅक्सवेलची विकेट मिळवली. पुन्हा मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्याने DRS घेतला गेला आणि पुन्हा भारताच्या बाजूने निकाल लागला. यानंतर रोहित मस्करी करताना दिसला. त्याने ॲनिमेटेड चेहरा केला आणि त्यानंतर कार्तिकचा जबडा पकडला. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

एका कार्यक्रमात धोनीला याबाबत विचारले गेले त्यावर तो म्हणाला, ''खरं सांगायचं तर मैदानावर कुणी झेल सोडण्याची किंवा क्षेत्ररणात चुका करण्याची कोणाचीच इच्छा नसते. पण, जर असं झेल सोडणे किंवा क्षेत्ररक्षणात कुणाकडून चूक झाली  मी त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करायचो. संतापून, रागावून तुम्हाला मदत मिळणार नाही. स्टेडियममध्ये जवळपास ४० हजार लोकं सामना पाहत असतात, टीव्हीवर लाखो, करोडो लोकं मॅच पाहतात. माझं काम होतं की चुकामागचं कारण शोधणं.'' 

सूर्यकुमार यादवने दोन दिवसांपूर्वी या प्रसंगावर त्याचं मत मांडलं होतं. तो म्हणाला, त्या DRS बद्दल बोलायचे झाल्यास कधीकधी यष्टिंमागे उभ्या असलेल्या खेळाडूंना चेंडू व बॅट यांच्यातल्या संपर्काचा आवाज ऐकू जात नाही, पण उजव्या-डाव्या बाजूला असलेल्या खेळाडूला ऐकू जाते. रोहित व दिनेश इतकी वर्ष एकत्र खेळत आहेत आणि ते एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे त्यांच्यात एवढी मस्करी तर चालतेच.

Web Title: IND vs AUS 2nd T20I : Team India ex-captain MS Dhoni calls for Rohit Sharma to keep his cool, says ‘Getting angry does not help matters’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.