Ind vs Aus 2nd test live : ऐतिहासिक विजय! भारतीय संघाने तीन दिवसांत जिंकली कसोटी; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे राखली

India vs Australia 2nd test live score updates : भारतीय संघाने आणखी एक कसोटी तीन दिवसांत जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 01:48 PM2023-02-19T13:48:42+5:302023-02-19T13:51:12+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus 2nd test live : Historic win! History - India becomes the first team to retain the BGT for 4th consecutive time, India beat Australia in 2nd Test to lead 2-0. | Ind vs Aus 2nd test live : ऐतिहासिक विजय! भारतीय संघाने तीन दिवसांत जिंकली कसोटी; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे राखली

Ind vs Aus 2nd test live : ऐतिहासिक विजय! भारतीय संघाने तीन दिवसांत जिंकली कसोटी; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे राखली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd test live score updates : भारतीय संघाने आणखी एक कसोटी तीन दिवसांत जिंकली. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. दीड तासांत या दोघांनी ९ विकेट्स घेत कांगारूंचा दुसरा डाव ११३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांनी चांगली फटकेबाजी करून भारताचा विजय पक्का केला आणि भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या निकालासोबतच भारतीय संघ कसोटी क्रमवारीत नंबर वन झाला. वन डे, ट्वेंटी-२० व कसोटी एकाच वेळी नंबर वन होणारा हा आशियातील पहिलाच संघ ठरला. 

World Record! विराट कोहलीचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम; रिकी पाँटिंगलाही टाकले मागे


ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले.  ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ६ धावांवर पहिला धक्का बसला. रोहित शर्माने चांगले फटके मारले, परंतु चेतेश्वर पुजाराची विकेट वाचवण्यासाठी त्याने विकेट फेकली. रोहित २० चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. 



विराटने पुजारासह डाव सावरला अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ( Innings) मध्ये २५ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज तो ठरला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकचा विक्रम मोडला. विराटने ५४९ डावांत हा टप्पा ओलांडला. सचिनला ५७७ डाव खेळावे लागले होते. शिवाय वयाच्या ३४ पर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने रिकी पाँटिंगचा २४१९३ धावांचा विक्रम मोडला.

टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात विराट ( २०) स्टम्पिंग झाला.  श्रेयस अय्यरही झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात १२ धावांवर बाद झाला. केएस भरतने आक्रमक फटकेबाजी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन भारताने बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे राखली. भारताने सलग चौथ्यांदा ही ट्रॉफी स्वतःकडे राहून इतिहास घडवला. पुजारा ३१ आणि भरत २३ धावांवर नाबाद राहिले.

 

Last 4 Border Gavaskar Trophy:
2017 - India won.
2019 - India won.
2021 - India won.
2023 - India retains*.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Ind vs Aus 2nd test live : Historic win! History - India becomes the first team to retain the BGT for 4th consecutive time, India beat Australia in 2nd Test to lead 2-0.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.