Join us  

Rishabh Pant: ४८ दिवस बॅटला हात लावला नाही, तरीही रिषभ पंतच नंबर १! पाहा कसं काय? 

रिषभ पंतचा डिसेंबर अखेरीस अपघात झाला, तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 5:08 PM

Open in App

Rishabh Pant, ICC Test Rankings : टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत ३० डिसेंबर २०२२ रोजी एका अपघातात जखमी झाला. अपघात झाल्यापासून रिषभ पंत रुग्णालयात आहे. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. या खेळाडूने गेल्या ४८ दिवसांपासून त्याने बॅटला हातही लावलेला नाही. असे असतानाही पंतची कसोटी क्रमवारीतील स्थान कायम आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल स्थान राखून आहे. तो सातव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे, आर अश्विननेही कसोटी क्रमवारीत आपली चुणूक दाखवली आहे. गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने नागपूर कसोटीत ८ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यामुळेच हा खेळाडू नंबर २ चा कसोटी गोलंदाज बनला आहे. दुसरीकडे, गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास पाच महिन्यांनी संघात पुनरागमन करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा १६ व्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात जाडेजा त्याच्या अष्टपैलू खेळामुळे सामनावीर ठरला.

अश्विन-जडेजाची अप्रतिम कामगिरी

अश्विन आणि जाडेजा या जोडीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत १५ विकेट घेतल्या. भारताने तीन दिवसांत हा सामना १३२ धावांनी जिंकली. अश्विनने दुसऱ्या डावात ३७ धावांत पाच बळी आणि पहिल्या डावात ४२ धावांत तीन बळी घेतले. तो गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सपेक्षा २१ रेटिंग गुणांनी मागे आहे. जाडेजाने सामन्याच्या पहिल्या डावात ४७ धावांत पाच आणि दुसऱ्या डावात ३४ धावांत दोन बळी घेतले. भारताच्या इतर गोलंदाजांमध्ये, दुखापतीमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माला नागपुरातील त्याच्या शतकाचा फायदा झाला आणि तो १०व्या स्थानावरून ८व्या स्थानावर पोहोचला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिषभ पंतभारतीय क्रिकेट संघआर अश्विन
Open in App