Join us  

IND vs AUS, 2nd Test : आर अश्विनने Live Match मध्ये स्टीव्ह स्मिथसोबत असं काही केलं, विराट कोहलीला हसू नाही आवरलं, Video

India vs Australia 2nd test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी (IND vs AUS 2री कसोटी) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 4:51 PM

Open in App

India vs Australia 2nd test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी (IND vs AUS 2री कसोटी) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळली गेली.  तिसऱ्या दिवशी दीड तासात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी १० विकेट्स घेतल्या. पण, या सामन्यात अश्विनने केलेल्या एका कृत्याने विराट कोहली लोटपोट झाला. स्टीव्ह स्मिथची विकेट घेण्यापूर्वी अश्विनने त्याला मंकडिंग ( रन आऊट) करण्याचा प्रयत्न केला,  पण तो थोडक्यात बचावला.  

लोकेश राहुलचा कसोटीतून पत्ता कट? रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या विधानानं उंचावल्या भुवया 

ऑस्ट्रेलियन डावाच्या १४.४  षटकांमध्ये चेंडू अश्विनच्या हातात होता, तर मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ क्रीजवर होते. अश्विन लाबुशेनकडे चेंडू टाकणार इतक्यात स्मिथ क्रिझच्या पुढे गेला, त्यानंतर अश्विनने मुद्दाम त्याला मंकडिंग करण्याची हुल दिली आणि  बॉल टाकला नाही. त्यानंतर सर्वजण हसू लागले. यादरम्यान विराट कोहलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती, तो मैदानात हसून टाळ्या वाजवू लागला.

आयपीएल २०१९ मध्ये अश्विनने प्रथमच मंकडिंग केले होते. तेव्हा तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता. त्यावेळी पंजाब आणि राजस्थान यांच्यात सामना खेळला जात होता, या सामन्यात अश्विनने इंग्लंड आणि राजस्थानचा फलंदाज जोस बटलर मंकडिंग बाद झाला. यानंतर वादही झाला होता.  

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले.  ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने २० चेंडूंत ३१ धावा केल्या. विराटने २० धावा केल्या. श्रेयस अय्यर १२ धावांवर बाद झाला. पुजारा ३१ आणि भरत २३ धावांवर नाबाद राहिले आणि भारताने ६ विकेट्सने हा सामना जिंकला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीआर अश्विन
Open in App