Join us

वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)

Virat Kohli Rohit Sharma fans, IND vs AUS Viral Video : भारताच्या दोन बड्या खेळाडूंची फलंदाजी पाहायला ऑस्ट्रेलियन चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 20:18 IST

Open in App

Virat Kohli Rohit Sharma fans, IND vs AUS Viral Video : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केली. न्यूझीलंडविरूद्ध घरच्या मैदानावर ३-० ने पराभूत होणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियात कमाल करून दाखवली. नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव उपलब्ध नसल्याने, जसप्रीत बुमराहने भारताचे नेतृत्व केले. कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत त्याने पहिल्या कसोटीत ८ बळी टिपले आणि सामनावीराचा किताब जिंकला. आता दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून खेळली अडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे. दुसऱ्यांदा बाबा झालेला रोहित शर्मा पालकत्व रजा संपवून संघात सामील झाला आणि आज रोहित-विराटने एकत्र सराव (net practice) केला. त्यावेळी एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला.

विराट-रोहितची एकत्र नेट प्रक्टिस

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात येऊन संघात सामील झाला. त्यातच आज मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील टीम इंडिया असलेल्या अँडलेडमध्ये दाखल झाला. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी आज नेट्समध्ये सराव केला. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. भारतात टीम इंडियाच्या खेळाडूंचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहेच. पण ऑस्ट्रेलियात देखील रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचा मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसून आले. हे दोघे जेव्हा नेट्समध्ये सराव करण्यासाठी उतरले, त्यावेळी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची आसपास गर्दी केली आणि त्यांची नेट प्रक्टिसमधील खेळाचा मनमुराद लुटला.

-----------

दरम्यान, दुसऱ्या सामन्यापासून संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणार आहे. त्यासोबतच त्याला विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरूद्ध चार कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. रोहितला खास यादीत प्रवेश मिळण्यासाठी एका विजयाची गरज आहे. रोहितने दुसरी कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि सौरव गांगुली यांच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर येईल. या यादीत १३ पैकी ८ विजयांसह महेंद्रसिंग धोनी अव्वलस्थानी आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्माआॅस्ट्रेलियाजसप्रित बुमराह