'कांगारूं'च्या शेपटाने टीम इंडियाला रडवलं, भारताला दिलं 250 पारचं आव्हान

ind vs aus live match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वन डे सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:51 PM2023-03-22T17:51:12+5:302023-03-22T17:51:40+5:30

whatsapp join usJoin us
 ind vs aus 3rd ODI live Australia scored 269 all out in 49 overs batting first. Hardik Pandya and Kuldeep Yadav took 3 wickets each | 'कांगारूं'च्या शेपटाने टीम इंडियाला रडवलं, भारताला दिलं 250 पारचं आव्हान

'कांगारूं'च्या शेपटाने टीम इंडियाला रडवलं, भारताला दिलं 250 पारचं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ind vs aus 3rd ODI live । चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे संघाने विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. तिसऱ्या सामन्यात कांगारूच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकांत सर्वबाद 269 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली पण ऑस्ट्रेलियाने सांघिक खेळी करून धावा 250 पार नेल्या.

ऑस्ट्रेलियाची सांघिक खेळी 
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड (33) आणि मिचेल मार्श (47) या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. स्फोटक सुरूवात करून कांगारूने यजमानांवर दबाव टाकला. पण हार्दिक पांड्याने कांगारूच्या फलंदाजीला सुरूंग लावत एका पाठोपाठ 3 मोठे झटके दिले. पांड्याने हेड, कर्णधार स्टीव्ह स्मिथ याशिवाय आक्रमक वाटणाऱ्या मिचेल मार्शला बाद करून भारतीय चाहत्यांना जागे केले. 

ऑस्ट्रेलियन संघाकडून कोणालाच मोठी भागीदारी करता आली नाही. पण सांघिक खेळी करत कांगारूंनी डाव पुढे नेला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक (47) धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नर (23), लेक्स कॅरी (38), मार्कस स्टॉयनिस (25), सीन बॉट (25) आणि श्टन अगर (17) धावा करून बाद झाला. 

भारतीय गोलंदाज चमकले
भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले.  
 
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी. 

आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबूशेन, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन अगर, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title:  ind vs aus 3rd ODI live Australia scored 269 all out in 49 overs batting first. Hardik Pandya and Kuldeep Yadav took 3 wickets each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.