Join us  

Video : रोहित शर्माने विजयी ट्रॉफी नाही स्वीकारली, दुसऱ्याच खेळाडूला बोलावले अन् नंतर 

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाने तिसरी वन डे मॅच ६६ धावांनी जिंकून भारताविरुद्ध व्हाईटवॉश टाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:20 PM

Open in App

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाने तिसरी वन डे मॅच ६६ धावांनी जिंकून भारताविरुद्ध व्हाईटवॉश टाळला. ३५२ धावांच्या प्रत्युत्तरात  भारताचा संपूर्ण संघ २८६ धावांवर तंबूत परतला. ग्लेन मॅक्सवेलने १० षटकांत ४० धावांत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. विजयानंतर निरंजन शाह ट्रॉफी देण्यासाठी आले होते, परंतु रोहित शर्माने ती स्वतः न स्वीकारता दुसऱ्याच खेळाडूला बोलावले अन्...  

ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी १३७ धावांची भागीदारी केली. मार्श ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर बाद झाला, तर स्मिथने ६१ चेंडूंत ७४ धावा केल्या. अॅलेक्स केरी ( ११), ग्लेन मॅस्कवेल ( ५), कॅमेरून ग्रीन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून भारतीय गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. मार्नस लाबुशेनने ५८ चेंडूंत उपयुक्त ७२ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.

भारताकडून रोहित शर्माने ५७ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ८१ धावा केल्या. विराट कोहलीनेही ५६ धावा केल्या.  श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी केली, परंतु इतरांनी निराश केले. मॅक्सवेलने वॉशिंग्टन सुंदर, रोहित, विराट व श्रेयस या विकेट्स घेतल्या. लोकेश राहुल ( २६) व रवींद्र जडेजा ( ३५) यांचा संघर्ष तोकडा पडला. जोश हेझलवूडने २ विकेट्स घेतल्या. रोहितने ट्रॉफी स्वीकारण्यासाठी लोकेश राहुलला बोलावले... लोकेशच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेतील पहिल्या दोन वन डे मॅच जिंकल्या होत्या. त्यानंतर सेलिब्रेशन करताना ही ट्रॉफी सौराष्ट्रच्या स्थानिक खेळाडूंच्या हाती दिली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मालोकेश राहुल