खेळपट्टी सपाट अन् ऑस्ट्रेलिया सुसाट! पण, भारतीय गोलंदाजांचे जबरदस्त कमबॅक 

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ही खेळपट्टी हाय वे सारखी असल्याची टीका माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:15 PM2023-09-27T17:15:10+5:302023-09-27T17:19:17+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 3rd ODI Live Update Marathi : India needs 353 runs to white-wash Australia for the first time in ODIs, Good comeback of indian bowlers | खेळपट्टी सपाट अन् ऑस्ट्रेलिया सुसाट! पण, भारतीय गोलंदाजांचे जबरदस्त कमबॅक 

खेळपट्टी सपाट अन् ऑस्ट्रेलिया सुसाट! पण, भारतीय गोलंदाजांचे जबरदस्त कमबॅक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ही खेळपट्टी हाय वे सारखी असल्याची टीका माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली. कारण, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दिसले. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावताना अबकी बार ४०० पार असाच खेळ केला होता. मार्शचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. पण, भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगले कमबॅक केले अन् ऑसींच्या विकेट्स घेतल्या. 

Funny Video! सूर्य तापला, स्मिथ खूर्चीवर बसला! Virat Kohli भलत्याच मूडमध्ये दिसला


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला अन् पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच षटकात वॉर्नरने १९ धावा कुटल्या, परंतु पुढच्या षटकात कृष्णाला स्कूप मारण्याच्या प्रयत्नात वॉर्नर झेलबाद झाला. वॉर्नरने ३४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा चोपल्या. मार्श व स्टीव्ह स्मिथ यांनी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर दणदणीत फटकेबाजी केली. समालोचक रवी शास्त्री यांनी रायपूरच्या खेळपट्टीचा उल्लेख हाय वे असा केला... गोलंदाजांना इथे काहीच मदत मिळत नव्हती. 


मार्श आणि स्मिथ यांची ११८ चेंडूंवरील १३७ धावांची भागीदारी कुलदीप यादवने तोडली. मार्श  ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर कव्हरला कृष्णाच्या हाती झेल देऊन परतला. पाठोपाठ स्मिथही ६१ चेंडूंत ७४ धावा करून माघारी परतला. मोहम्मद सिराजने ही विकेट मिळवली. ऑस्ट्रेलियाने ३४ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात २५० धावा फलकावर चढवल्या. अॅलेक्स केरीला ( ११) जसप्रीत बुमराहने माघारी पाठवले. पुढच्या षटकात बुमराहने ग्लेन मॅस्कवेलचा ( ५) त्रिफळा उडवला. ( जसप्रीतचा खतरनाक यॉर्कर Video


धडाधड विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली. त्यात कुलदीपने हिटर कॅमेरून ग्रीनची ( ९) विकेट मिळवून दिली. मार्नस लाबुशेनने संयमी खेळ करताना अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३५२ धावा केल्या. लाबुशेन ५८ चेंडूंत ७२ धावांवर बाद झाला. बुमराहने ३, तर कुलदीपने २ विकेट्स घेतल्या. 

Web Title: IND vs AUS 3rd ODI Live Update Marathi : India needs 353 runs to white-wash Australia for the first time in ODIs, Good comeback of indian bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.