ग्लेन मॅक्सवेलने अविश्वसनीय झेल घेतला, रोहित शर्मासह कुणालाच विश्वास नाही बसला, Video 

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाच्या ३५२ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. पण, ग्लेन मॅक्सवेलने भारताच्या आघाडीच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:51 PM2023-09-27T19:51:24+5:302023-09-27T19:56:32+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 3rd ODI Live Update Marathi : Rohit Sharma scored 81 (57) with 5 fours and 6 sixes, Stunning catch by Glenn Maxwell, and he couldn't believe it either, Video | ग्लेन मॅक्सवेलने अविश्वसनीय झेल घेतला, रोहित शर्मासह कुणालाच विश्वास नाही बसला, Video 

ग्लेन मॅक्सवेलने अविश्वसनीय झेल घेतला, रोहित शर्मासह कुणालाच विश्वास नाही बसला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाच्या ३५२ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदरला सोबत घेत त्याने ७४ धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट कोहलीसह जोडी जमवली. रोहित आज विक्रमी खेळी करतोय असे वाटत असताना ग्लेन मॅक्सवेलने घात केला. मॅक्सवेलने भारताच्या आघाडीच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. 


शुबमन गिल व इशान किशन यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासह आज ओपनिंगला वॉशिंग्ट सुंदर आला. या दोघांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक २५९ षटकाराचा विक्रम रोहितने नावावर नोंदवला. ४८ धावांवर असताना रोहितचा पूल शॉट फसला, परंतु मिचेल स्टार्ककडून झेल सुटला. रोहितने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. वॉशिंग्टन ( १८) चा लाबुशेनने सुरेख झेल टिपला आणि भारताला ७४ धावांवर पहिला धक्का बसला. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५३ षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत आणि त्यानंतर रोहित ५५० षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने सर्वात जलद ५५० षटकारांचा टप्पा ओलांडला. आज हिटमॅन शतक झळकावेल असेच वाटले होते आणि विराट कोहलीची त्याला चांगली साथ मिळाली होती. या दोघांची ७० धावांची भागीदारी मॅक्सवेलनेच तोडली. रोहितने मारलेला सरळ फटक्यापासून वाचण्यासाठी मॅक्सवेलने हात बाजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बरोबर त्याच्या हाताला चिकटला. त्यालाही हा झेल कसा झाला तेच समजेनासे झाले. रोहित ५७ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ८१ धावांवर बाद झाला. भारताला १४४ धावांवर दुसरा धक्का बसला. 



ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ११८ चेंडूं त १३७ धावांची भागीदारी केली. मार्श ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर बाद झाला, तर स्मिथने ६१ चेंडूंत ७४ धावा केल्या. अॅलेक्स केरी ( ११), ग्लेन मॅस्कवेल ( ५), कॅमेरून ग्रीन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून भारतीय गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. मार्नस लाबुशेनने ५८ चेंडूंत उपयुक्त ७२ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.
 

Web Title: IND vs AUS 3rd ODI Live Update Marathi : Rohit Sharma scored 81 (57) with 5 fours and 6 sixes, Stunning catch by Glenn Maxwell, and he couldn't believe it either, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.