India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाच्या ३५२ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदरला सोबत घेत त्याने ७४ धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट कोहलीसह जोडी जमवली. रोहित आज विक्रमी खेळी करतोय असे वाटत असताना ग्लेन मॅक्सवेलने घात केला. मॅक्सवेलने भारताच्या आघाडीच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले.
शुबमन गिल व इशान किशन यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासह आज ओपनिंगला वॉशिंग्ट सुंदर आला. या दोघांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक २५९ षटकाराचा विक्रम रोहितने नावावर नोंदवला. ४८ धावांवर असताना रोहितचा पूल शॉट फसला, परंतु मिचेल स्टार्ककडून झेल सुटला. रोहितने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. वॉशिंग्टन ( १८) चा लाबुशेनने सुरेख झेल टिपला आणि भारताला ७४ धावांवर पहिला धक्का बसला.
ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ११८ चेंडूं त १३७ धावांची भागीदारी केली. मार्श ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर बाद झाला, तर स्मिथने ६१ चेंडूंत ७४ धावा केल्या. अॅलेक्स केरी ( ११), ग्लेन मॅस्कवेल ( ५), कॅमेरून ग्रीन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून भारतीय गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. मार्नस लाबुशेनने ५८ चेंडूंत उपयुक्त ७२ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.