Join us  

सरप्राईज! रोहित शर्मासोबत ओपनिंगला भारी खेळाडू येणार; चाहत्यांना आनंद मिळणार

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : शुबमन गिलला विश्रांती दिली गेली आहे, तर इशान किशन आजारी पडल्याने आज खेळत नाहीए.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 3:06 PM

Open in App

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव हे विश्रांतीवरून परतले आहेत. शुबमन गिलला विश्रांती दिली गेली आहे, तर इशान किशन आजारी पडल्याने आज खेळत नाहीए. अशात भारताकडून आज सलामीला कोण खेळणार, हा प्रश्न चाहत्यांना आहे. त्याचे उत्तर ऐकून सर्वांन आनंदाचा धक्का बसणार आहे.

सर्वोत्तम धावसंख्या ते सर्वात मोठा विजय! नेपाळचे एका ट्वेंटी-२०त ८ वर्ल्ड रेकॉर्ड

 ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिले दोन सामने हरल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे आज गमावण्यासाऱखं काहीच नाही आणि त्यामुळेच ते बिनधास्त फटकेबाजी करताना दिसले. मिचेल मार्शने तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहला अन् डेव्हिड वॉर्नरने पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजला खेचलेले षटकार पाहण्यासारखे होते. या दोघांनी ६.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. जसप्रीतच्या पहिल्या तीन षटकांत ऑसींनी २६ धावा कुटल्या अन् वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत जसप्रीतच्या पहिल्या ३ षटकांतील या सर्वाधिक धावा ठरल्या. यापूर्वी २०१७मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने पहिल्या ३ षटकांत १ बाद २५ धावा दिल्या होत्या. 

प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच षटकात वॉर्नरने १९ धावा कुटल्या, परंतु पुढच्या षटकात कृष्णाला स्कूप मारण्याच्या प्रयत्नात वॉर्नर यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद झाला. डेव्हिड वॉर्नरने ३४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाला ७८ धावांवर पहिला धक्का बसला.  मार्श व स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. स्मिथने वन डेत ५००० धावांचा टप्पा ओलांडला. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर मार्शनेही अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १ बाद १४६ धावा केल्या आहेत. मार्श व स्मिथ खेळतोय... लाईव्ह स्कोअरबोर्डसाठी

भारताकडून ओपनिंगला कोण?शुबमन गिल आणि इशान किशन यांच्या गैरहजेरीत रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण येणार हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय. लोकेश राहुलकडे ओपनिंगचा अनुभव आहे, परंतु तो पाचव्या क्रमांकावर चांगला सेट झाला आहे. श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव ओपनिंगला येणं अवघड आहे. अशात रोहितसोबत विराट कोहली आज ओपनिंगला येणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल