India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : मालिका खिशात घालत्यानंतर भारतीय संघ आज रिलॅक्समूडमध्ये मैदानावर उतरला आहे. रायपूरची खेळपट्टी सपाट असल्याने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खोऱ्याने धावा चोपत आहेत. पण, त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होताना दिसतोय आणि अम्पायर्सही ड्रींक्स ब्रेक घेत आहेत. अशात स्टीव्ह स्मिथ एवढा दमलेला दिसला की त्याच्यासाठी खेळाडू मैदानावर खूर्ची घेऊन आले. तो त्यावर बसून पाणी प्यायला आणि थोडा आराम केला. त्याचवेळी मार्नस लाबुशेनही त्याच्या बाजूला उभा होता आणि तितक्यात विराट कोहली तिथे आला अन्....
मिचेल 'हार्श'! १९ चेंडूंत ७० धावा; ऑस्ट्रेलियन फलंदाजाने बेक्कार चोपले, शतक ४ धावांनी हुकले
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला अन् पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच षटकात वॉर्नरने १९ धावा कुटल्या, परंतु पुढच्या षटकात कृष्णाला स्कूप मारण्याच्या प्रयत्नात वॉर्नर झेलबाद झाला. वॉर्नरने ३४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा चोपल्या. मार्श व स्टीव्ह स्मिथ यांनी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर दणदणीत फटकेबाजी केली. समालोचक रवी शास्त्री यांनी रायपूरच्या खेळपट्टीचा उल्लेख हाय वे असा केला... गोलंदाजांना इथे काहीच मदत मिळत नव्हती आणि ऑसी फलंदाजांनी २६व्या षटकातच फलकावर २०० धावा चढवल्या. लाईव्ह स्कोअरबोर्डसाठी
मार्श आणि स्मिथ यांची ११८ चेंडूंवरील १३७ धावांची भागीदारी कुलदीप यादवने तोडली. मार्श ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर कव्हरला कृष्णाच्या हाती झेल देऊन परतला. पाठोपाठ स्मिथही ६१ चेंडूंत ७४ धावा करून माघारी परतला. मोहम्मद सिराजने ही विकेट मिळवली. या विकेटआधी स्मिथ उष्णतेने त्रस्त दिसला अन् त्याच्यासाठी खूर्ची मागवण्यात आली. यावेळी विराट मात्र भलत्याच मूडमध्ये पाहायला मिळाला. तो लाबुशेनसमोर जाऊन नाचताना व त्याला चिडवताना पाहायला मिळाला. याआधीही विराटने फेक कॅचची अपील करून चाहत्यांचा उत्साह वाढवला होता.
Web Title: IND vs AUS 3rd ODI Live Update Marathi : Virat kohli dancing and poking Marnus Labuschagne with Steve Smith on the chair sums up the game, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.