Join us  

IND vs AUS 3rd ODI: स्टीव्ह स्मिथचं मैदानातच 'घालीन लोटांगण', सरपटी थ्रो... तरीही अक्षर झाला Run Out, पाहा Video

Steve Smith, Axar Patel Runout: विराट समोरच उभा होता, त्याने अचानक अक्षरला परत जायला सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:03 PM

Open in App

Steve Smith, Axar Patel Run Out, IND vs AUS 3rd ODI: निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला २७० धावांचे आव्हान दिले. मिचेल मार्शच्या ४७, अलेक्स कॅरीच्या ३८ आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळीच्या साथीने ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना, अक्षर पटेल धावचीत झाला. विराट कोहलीशी थोडासा विसंवाद झाल्याने हा प्रकार घडला, पण स्टीव्ह स्मिथने तेथे मोलाची भूमिका बजावली.

सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली भागीदारी होत होती. पण रोहित शर्मा ३० धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिल ३७ धावांवर LBW झाला. केएल राहुलने ५० चेंडूत ३२ धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेल मैदानात आला. विराट कोहलीने तो मैदानात असताना अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर एकेरी धाव घेत असताना अक्षर पटेलला धाव घेणं जमलं नाही. विराट कोहलीशी एका धावेसाठी थोडा गोंधळ झाला. याच मधल्या वेळेत स्टीव्ह स्मिथने दमदार फिल्डिंग केली. त्याच्या दिशेने आलेला चेंडू त्याने उडी मारून आडवला. इतकेच नव्हे तर त्याने त्याच परिस्थितीत चक्क सरपटी थ्रो केला. अक्षर पटेलला मागे जाण्यासाठी मात्र पुरेसा वेळ न मिळाल्याने तो मागे फिरला, पण अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या विकेटकिपरने देखील उडी मारून चेंडू घेतला आणि स्टंपला लावून अक्षरला २ धावांवर माघारी पाठवले. पाहा व्हिडीओ-

त्याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श जोडीने पाहुण्यांना चांगली सुरूवात मिळवून दिली होती. त्यांनी १० षटकांच्या आत ६८ धावापर्यंत केल्या. पण ट्रेव्हिस हेड (३३), मिचेल मार्श (४७) दोघांना हार्दिकने बाद केले. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथलाही त्याने शून्यावर माघारी पाठवले. नंतर कुलदीप यादवने डेव्हिड वॉर्नर २३ तर आणि मार्नस लाबूशेन २८ धावांवर बाद झाला. अलेक्स कॅरीच्या ३८ आणि मार्कस स्टॉयनीसच्या २५ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने द्विशतकी मजल मारली. अखेर अबोटच्या २६, अगारच्या १७, मिचेल स्टार्कच्या १० आणि अडम झम्पाच्या नाबाद १० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या. भारताकडून हार्दिक, कुलदीपने ३-३ तर सिराज, अक्षरने २-२ बळी टिपले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथअक्षर पटेलविराट कोहली
Open in App