ठळक मुद्दे ऑस्ट्रेलियाने जर तिसरा सामना जिंकला तर त्यांना मालिका 2-0 अशा फरकाने जिंकता येणार आहे.जर भारताने हा सामना जिंकला तर मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटू शकेल. जर तिसरा सामना रद्द करावा लागला तर ऑस्ट्रेलिया ही मालिका 1-0 या फरकाने जिंकू शकणार आहे.
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरा सामना जिंकावाच लागेल. कारण हा सामना गमावला तर त्यांना मालिका गमवावी लागू शकते. पण तिसऱ्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियापेक्षा 'या' गोष्टीचेच मोठे आव्हान मोठे असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत दोन सामने झाले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे दोन सामन्यांनंतर या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे 1-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने जर तिसरा सामना जिंकला तर त्यांना मालिका 2-0 अशा फरकाने जिंकता येणार आहे. पण जर भारताने हा सामना जिंकला तर मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटू शकेल. पण जर तिसरा सामना रद्द करावा लागला तर ऑस्ट्रेलिया ही मालिका 1-0 या फरकाने जिंकू शकणार आहे.
त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतासाठी पाऊस न पडणे हे महत्वाचे असेल. पण येथील वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी २० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण जर पावसाचा जोर जास्त असला आणि सामना रद्द झाला तर भारताला ही मालिका गमवावी लागू शकते.
Web Title: IND vs AUS 3rd T20: for India rain is the biggest challenge than Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.