Join us  

२४ तासांत भारताकडून दुसरा वादग्रस्त रन आऊट, दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जला लागून बेल्स उडाली अन् वादाची ठिणगी पडली, Video

IND vs AUS T20 2022 Live Match : भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये ३-० अशी विजयी मालिका जिंकून इतिहास घडविला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 9:24 PM

Open in App

IND vs AUS T20 2022 Live Match : भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये ३-० अशी विजयी मालिका जिंकून इतिहास घडविला. तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडला विजयासाठी १६ धावांची गरज असताना दिप्ती शर्माने मांकडिंग करताना विकेट मिळवली अन् त्यावरून सोशल वॉर सुरू झाला. हे प्रकरण ताजे असताना भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातील ग्लेन मॅक्सवेलचा ( Glenn Maxwell) रन आऊटही वादात अडकला आहे. 

 कॅमेरून ग्रीननंतर Mumbai Indiansचा युवा फलंदाज चमकला; Glenn Maxwellच्या विकेटने राडा झाला 

दीप्ती शर्माने कसे बाद केले ?१६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ९ फलंदाज ११८ धावांत माघारी परतले होते. त्यानंतर चार्लिन डीन हिने अखेरच्या सहकाऱ्यासह ३५ धावा जोडत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. दीप्ती शर्मा हिने ४४ व्य षटकात डीन हिला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले आणि इंग्लंडच्या झुंजीवर पाणी फिरवले. ४४ व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी दीप्ती शर्मा हिने बॉलिंग मार्कवरून धावण्यास सुरुवात केली असतानाच यष्ट्यांजवळ आल्यावर डीन नॉन स्ट्राईकवर असलेली डीन ही लाईनच्या बाहेर असल्याचे दीप्तीला दिसले आणि तिने संधी साधून मागे वळत बेल्स उडवून डीनला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले. हे दृश्य पाहून सर्व खेळाडू काही क्षण स्तब्ध झाले. मात्र नव्या बदलानुसार अशा पद्धतीने बाद करण्यास आयसीसीने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे डीन बाद ठरली.

दिनेश कार्तिक अन् वाद...युजवेंद्र चहलच्या ८व्या षटकात मॅक्सवेलने चेंडू चांगला टोलवला, परंतु सीमारेषेवर अक्षरने तो अडवला. दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मॅक्सवेलच्या दिशेने अचूक थ्रो केला अन् यष्टिंचा वेध घेतला. पण, चेंडू यष्टिंवर आदळण्यापूर्वी बेल्स यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जने पडली. दुसरी बेल  नंतर चेंडू लागल्याने पडली आणि मॅक्सवेलला ( ६) माघारी जावे लागले. कार्तिकच्या हाताने बेल्स पडल्याने मॅक्सवेलला नाबाद असल्याचे वाटले, पंरतु तिसऱ्या अम्पायरने प्रसंगावधान दाखवून पुन्हा रिव्ह्यू पाहिला आणि त्यात मॅक्सवेल क्रीजवर परतण्याआधी चेंडू लागून दुसरी बेल्स पडल्याचे दिसले व भारताला विकेट मिळाली.

नेटिझन्स काय म्हणत असले तरी नियमानुसार ही विकेट योग्य असल्याचे समोर आले आहे..

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादिनेश कार्तिकग्लेन मॅक्सवेल
Open in App