IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. रिषभ पंत याच्याजागी आज रोहितने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुन्हा संघात इन केले. पण, भुवीच्या पहिल्याच षटकात सलग तीन चौकार खेचून इरादा पक्का केला. त्यानंतर अक्षर पटेललाही त्याने नाही सोडले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मारलेले सलग दोन षटकार लाजवाब होते. ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल, असेच चित्र दिसत होते. त्यात दिनेश कार्तिकची ( Dinesh Karthik) एक चूक महागात पडली असती नशीबाने अम्पायर्सने विकेट मिळवून दिली. अक्षरने चौथ्या षटकात ऑसी कर्णधार अॅरोन फिंचला ( ७) झेलबाद करून ४४ धावांवर पहिला धक्का दिला. कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) काही केल्या एकत नव्हता... फिंचची विकेट पडल्यानंतरही ग्रीनने पुढील तीन चेंडू चौकार खेचले. मोहाली ३० चेंडूंत ६१ धावा कुटणाऱ्या ग्रीनने आज हैदराबादमध्ये १९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. भुवनेश्वर कुमारने पाचव्या षटकात ग्रीनची विकेट मिळवली. ऑसी फलंदाज २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा करताना लोकेश राहुलच्या हाती झेलबाद झाला. अक्षरने सहावे षटक भारी टाकले. ऑसींनी २ बाद ६४ धावा पहिल्या पॉवर प्लेमध्ये करता आल्या. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अक्षरने ७व्या षटकात पॉइंटला स्टीव्ह स्मिथचा झेल टाकला. स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल ही नवी जोडी खेळपट्टीवर असल्याने भारतीय गोलंदाजांना दडपण निर्माण करण्याची संधी मिळाली. युजवेंद्र चहलच्या ८व्या षटकात मॅक्सवेलने चेंडू चांगला टोलवला, परंतु सीमारेषेवर अक्षरने तो अडवला. दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मॅक्सवेलच्या दिशेने अचूक थ्रो केला अन् यष्टिंचा वेध घेतला. पण, चेंडू यष्टिंवर आदळण्यापूर्वी बेल्स यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जने पडली. दुसरी बेल नंतर चेंडू लागल्याने पडली आणि मॅक्सवेलला ( ६) माघारी जावे लागले. कार्तिकच्या हाताने बेल्स पडल्याने मॅक्सवेलला नाबाद असल्याचे वाटले, पंरतु तिसऱ्या अम्पायरने प्रसंगावधान दाखवून पुन्हा रिव्ह्यू पाहिला आणि त्यात मॅक्सवेल क्रीजवर परतण्याआधी चेंडू लागून दुसरी बेल्स पडल्याचे दिसले व भारताला विकेट मिळाली.