India vs Australia 3rd T20I : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. रोहित शर्मा व लोकेश राहुल झटपट माघारी परतल्यानंतर विराट कोहली व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला. सूर्याने ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. त्याला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कारही दिला गेला. विराटनेही ४८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावा करून आपलं काम केलं.
रोहित शर्माने परंपरा मोडली! विजयाची ट्रॉफी युवा खेळाडूकडे नाही दिली, पाहा काय घडलं, Video
या विजयानंतर BCCI ने अक्षर पटेल व सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात सूर्यकुमार यादवला सामन्याआधी पोटात दुखत होतं आणि तापही आल्याचे समोर आलं. अक्षरने याबाबत जेव्हा सूर्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, वातावरण बदललं होतं आणि आपण प्रवासही केला होता. मला ताप आला होता आणि पोटातही दुखत होतं. मी पहाटे ३ वाजता डॉक्टर व फिजिओ यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं मला औषध द्या-इंजेक्शन द्या मला आजच्या सामन्यासाठी तयार करा. हिच जर वर्ल्ड कप फायनल असती तर काय झालं असतं? मी आजारपणाचं कारण देऊन बाहेर बसलो नसतो. मला सर्व परिस्थितीसाठी सज्ज राहायचं आहे. मी जेव्हा मैदानावर टीम इंडियाची जर्सी घालून मैदानावर उतरलो, तेव्हा सर्व आजारपण गायब झालं.
सर्वोत्तम क्षण! विजयी धाव सोडा, विराट कोहली- रोहित शर्मा यांचा 'तो' तुफान Viral झालेला Video पाहा
भारतीय संघ २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. ३२ वर्षीय सूर्यकुमार यादने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३१ सामन्यांत २९ डावांत ३७ च्या सरासरीने ९२६ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व ७ अर्धशतकांचा समावेश आहे. २०२२ मध्ये ट्वेंटी-२० सर्वाधिक ६८२ धावांचा विक्रमही सूर्याने नावावर केला आहे.