ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव रोहित शर्माला डिवचण्याचा टीम पेनचा प्रयत्नभारत मजबूत स्थितीत
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाचे पारडे जड झाले आहे. मयांक अग्रवालच्या दमदार सुरुवातीनंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची परीक्षा घेतली. पुजाराने कसोटी कारकिर्दीतील 17वे शतक झळकावले. पण, कोहलीचे शतक 18 धावांनी हुकले. मिचेल स्टार्कने कोहलीला 82 धावांवर माघारी पाठवले. त्यापाठोपाठ पुजाराही 106 धावांवर बाद झाला. यो दोघांनी भारताला मजबूत स्थितीत आणले आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी रडीचा डाव सुरू केला.
कोहली व पुजारा यांनी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळवू दिले नाही. मात्र, उपाहारानंतर हे दोघेही माघारी परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करण्याचे स्वप्न पडू लागले. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकर जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चहापानापर्यंत या दोघांनी नाबाद 47 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली.
हे दोघेही ऑसी गोलंदाजांना बधत नसल्याचे कळताच यजमानांच्या कर्णधार टीम पेन याने रडीचा डाव सुरू केला. त्याने यष्टिमागून
रोहित शर्माला शेरेबाजी मारण्यास सुरुवात केली. रोहितचे लक्ष विचलित करून त्याला बाद करण्याचा डाव पेनने आखला. तो सतत रोहितला डिवचत होता. तो रोहितला म्हणत होता की, तु जर षटकार खेचलास तर मी
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास तयार होईन. रोहितने त्याला प्रत्युत्तर देणे टाळले, परंतु
मुंबई इंडियन्सने त्याला चांगचेच उत्तर दिले.
Web Title: IND vs AUS 3rd Test: Australia captain Tim paine sledge with Rohit Sharma, Mumbai Indians give answer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.